संग्रहित छयाचित्र  विनोद तावडे
मुंबई

काँग्रेसच्या काळातच अदानींची प्रगती! विनोद तावडेंचा राहुल गांधींवर निशाणा

Maharashtra assembly elections 2024 : काँग्रेसच्या काळातच अदानी यांची प्रगती झाली. अदानी व रॉबर्ट वढेरा यांचे एकत्रित फोटो दाखवून राहुल गांधी यांचे आरोप खोटे ठरवण्याचा प्रयत्न भाजपचे नेते विनोद तावडे यांनी केला आहे.

Swapnil S

मुंबई : काँग्रेसच्या काळातच अदानी यांची प्रगती झाली. अदानी व रॉबर्ट वढेरा यांचे एकत्रित फोटो दाखवून राहुल गांधी यांचे आरोप खोटे ठरवण्याचा प्रयत्न भाजपचे नेते विनोद तावडे यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी मोदी, भाजप व अदानींवर जोरदार आरोप केले होते. त्या आरोपांना तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. ‘एक है, तो सेफ है आणि राहुल गांधी फेक है’, अशी टीका तावडे यांनी केली. धारावीची जमीन अदानीला देणार, असे राहुल गांधी म्हणतात. मात्र ही जमीन महाराष्ट्र सरकारकडेच राहणार आणि ज्याने ते टेंडर घेतले त्याला ती जागा जाणार, असे विनोद तावडे यांनी सांगितले. या टेंडरमध्ये एक कंपनी अदानींची होती, एक कंपनी ही अबुधाबीमधली होती, त्यात ज्याला टेंडर मिळाले त्याला हे काम देण्यात येणार आहे. धारावीमध्ये जे लोक राहतात त्या सर्वांना घरे मिळणार, असेही तावडे यांनी स्पष्ट केले आहे. धारावीच्या जागेसाठी अबुधाबीच्या शेखची कंपनी होती, मात्र, त्यांना ते मिळाले नाही. मग आम्ही असे म्हणायचे का ‘एक है, तो सेफ है, राहुल गांधी के मन मे शेख है’, असे म्हणायचे का आम्ही? असा सवालही त्यांनी केला.

महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक

महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक सर्वात जास्त आहे. २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षात १.१८ लाख कोटी आणि १.२५ लाख कोटी, २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत ७०,७९५ कोटींची गुंतवणूक आलेली आहे. एकूण गुंतवणुकीच्या सरासरी २१ टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात आली आणि आता तिमाहीत ५२ टक्के आली आहे. ही वस्तुस्थिती असताना राहुल गांधी महाराष्ट्राच्या जनतेला फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विनोद तावडे यांनी केला आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी