मनोज जामसुतकर, यामिनी जाधव 
मुंबई

भायखळा विधानसभा : दोन सेनेत चुरशीची लढत; एका जागेसाठी दावेदार मात्र अनेक, २ लाख ५७ हजार मतदारांचा कौल कोणाला?

Maharashtra Assembly Elections 2024 : भायखळा विधानसभा मतदारसंघात एकूण १४ उमेदवार रिंगणात उतरले असले तरी खरी लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी होणार आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : २०२४ ची विधानसभा निवडणूक ही अशी निवडणूक आहे की, यात दोन शिवसेना आमनेसामने उभे ठाकले आहेत. २०१९ पर्यंत एकाच शिवसेनेत असलेले २०२४ च्या निवडणुकीत राजकीय शत्रू झालेत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे निकालानंतर स्पष्ट होईल.

भायखळा विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भायखळा विधानसभा मतदारसंघात एकूण १४ उमेदवार रिंगणात उतरले असले तरी खरी लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी होणार आहे. त्यामुळे जागा एक-दावेदार १४, त्यात कोणाला मिळणार मतदारांचा कौल याकडे सगळ्यांचे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मनोज जामसुतकर उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवार राजकारणात आधीपासून सक्रिय असले तरी दोन शिवसेना असल्याने २ लाख ५७ हजार ८६५ मतदारांचा कौल कोणाला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल १५ ऑक्टोबर रोजी वाजले. त्या दिवसापासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. २९ ऑक्टोबर रोजी अधिकृत उमेदवार जाहीर झाले. मात्र मुंबईतील ३६ मतदार संघात अपक्ष उमेदवारांनी ही राजकीय भविष्य आजमावण्यासाठी निवडणुकीत उडी मारली आहे. मुंबईतील ३६ मतदार संघापैकी भायखळा विधानसभा मतदारसंघ एक. या मतदार संघात विविध समाजातील लोक वास्तव्य करतात. त्यामुळे प्रत्येक मतदारांचे मत उमेदवाराचे भाग्यविधाता ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार यामिनी जाधव या विद्यमान आमदार असले या मतदार संघात त्याची पकड चांगली आहे. विशेष म्हणजे महिला उमेदवार असल्याने महिलांची सहानुभूती त्यांना मिळण्याची शक्यता अधिक आहे. तर मनोज जामसुतकर हे माजी नगरसेवक असल्याने त्यांनाही मानणारा एक वर्ग भायखळा विधानसभा मतदारसंघात आहे. तर समाजवादी, बहुजन समाज पार्टी, एआयएमआयएम, पीस पार्टी अशा विविध पक्षांचे उमेदवारांचे आव्हान आहेच. त्यात चार अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी मारली आहे. अपक्ष आणि अन्य पक्षातील उमेदवारांमुळे मतांची विभागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार असला तरी दोन्ही उमेदवारांना मतदारांची मतातून किती पसंती मिळते हे २३ नोव्हेंबर रोजी निकालानंतर स्पष्ट होईल.

१४ उमेदवार रिंगणात -

■ मनोज पांडुरंग जामसुतकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

■ यामिनी यशवंत जाधव - शिवसेना

■ वारिस अली शेख - बहुजन समाज पार्टी

■ फरहान हबीब चौधरी पीस पार्टी

■ फैयाज अहमद रफीक अहमद खान एआयएमआयएम

■ मोहम्मद नईम शेख - एम पॉलिटिकल पार्टी

■ वहीद अहमद अब्दुल जलील कुरेशी बहुजन मुक्ती पार्टी

■ विनोद महादेव चव्हाण दिल्ली जनता पार्टी

■ शाहे आलम शमीम अहमद खान राष्ट्रीय ओलमा कौन्सिल

■ सईद अहमद खान- समाजवादी पार्टी

■ अब्बास एफ छत्रीवाला - अपक्ष

■ गिरीश दिलीप व-हाडी - अपक्ष

■ रेहान वसिउल्ला खान अपक्ष

■ साजिद कुरेशी - अपक्ष

मतदार संघातील संख्या

पुरुष १,३७,०५६

महिला - १,२०,८०२

तृतीयपंथ - ७

एकूण - २,५७,८६५

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी