मुंबई

"भाकरी मातोश्रीची खातात आणि..." ; विधानसभेत दादा भुसे - अजित पवार यांच्यात खडाजंगी

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला

प्रतिनिधी

आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला. आज अधिवेशनामध्ये मंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख केला. यावर राष्ट्रवादीच्या आमदारांनी आक्षेप घेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, 'मी कुठेही त्यांच्याबद्दल वाईट बोललेलो नाही, असे आढळ्यास ते काढून टाकावे' असे त्यांनी सांगितले.

दादा भुसे विधानसभेमध्ये संजय राऊतांसह ठाकरे गटावर टीका करत होते. संजय राऊत यांनी दादा भुसेंवर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले होते. त्याला उत्तर देताना दादा भुसे राऊतांवर टीका करताना म्हणाले, "आम्हाला गद्दार म्हणणारे आमच्या मतांवर निवडून येणारे महागद्दार यांनी ट्वीट करुन लूट केल्याचा आरोप माझ्यावर केला आहे. कोणत्याही माध्यमातून या ट्वीटची चौकशी करावी. या प्रकरणात मी दोषी आढळ्यास आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईन. पण यात काही खोटे आढळ्यास महागद्दार, सामना संपादकांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा. हे भाकरी मातोश्रीची खातात आणि मातोश्री शरद पवारांची करतात." असे विधान त्यांनी यावेळी केले.

दादा भुसेंच्या या विधानावर आक्षेप घेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. तसेच, यामध्ये शरद पवारांचे नाव घेण्याची काय गरज होती? असा सवाल करत त्यांचे नाव रेकॉर्डवरुन काढून टाकण्याची मागणी अजित पवारांनी केली. ते म्हणाले की, "तुम्हाला जे बोलायचे ते बोला. पण विनाकारण शरद पवार साहेबांचे नाव का घेतले? माझी मागणी आहे, पवार साहेबांचे नाव रेकॉर्डवरुन काढून टाका. आणि दादा भुसे, तुमचे शब्द मागे घ्या आणि दिलगिरी व्यक्त करा." अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

घरात चिखल, शेतात पाणीच पाणी! दुष्काळासाठी ओळखणारा मराठवाडा अतिवृष्टीने हैराण; बळीराजाच्या डोळ्यात अश्रू

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : आरोग्य उपचारांसाठी मोठा दिलासा, तर रेल्वे आणि गृहनिर्माण क्षेत्राला चालना

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव