मुंबई : पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेप्रमाणे अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याने प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या यंदापासून तीनऐवजी चार फेऱ्या राबविण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. हा बदल अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतही करण्यात येणार असून, याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सूतोवाच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. मात्र अद्यापपर्यंत प्रवेश फेरीमध्ये बदल करण्यासंदर्भातील कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.