प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

अभियांत्रिकीची अंतिम गुणवत्ता यादी २४ जुलैला; २ लाख १३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

अभियांत्रिकी अभ्याक्रमाची अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीवर हरकती व तक्रारी नोंदविण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) २२ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : अभियांत्रिकी अभ्याक्रमाची अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीवर हरकती व तक्रारी नोंदविण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) २२ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर अंतिम गुणवत्ता यादी २४ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २ लाख १३ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा सीईटी कक्षामार्फत १९ ते २७ एप्रिल दरम्यान विविध सत्रांमध्ये घेण्यात आली. अखेरच्या सत्रामध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये काही प्रश्न चुकीचे असल्याबाबत विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्यामुळे त्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी ५ मे रोजी अतिरिक्त प्रवेश परीक्षा घेण्यात आली. एमएचटी सीईटीच्या भौतिकशास्त्र, रसानयशास्त्र आणि गणित (पीसीएम) गटासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ४ लाख २२ हजार ६६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल १६ जूनला जाहीर करण्यात आला. त्यानंतर २७ जूनला अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार ३० जून ते १४ जुलैपर्यंत अर्ज नोंदणी प्रक्रिया, कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.

बीबीए-बीसीएच्या सीईटीला ८० टक्के उपस्थिती

सीईटी कक्षाने २९ आणि ३० एप्रिल रोजी घेतलेल्या परीक्षेची संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अतिरिक्त सीईटी घेण्याचा निर्णय घेतला होता. या अतिरिक्त सीईटीसाठी नोंदणी केलेल्या ४० हजार ६६७ विद्यार्थ्यांपैकी ३२ हजार ८३९ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. ही संख्या एकूण परीक्षार्थींच्या ८० टक्के एवढी होती.

कुलाब्याहून नवी मुंबई विमानतळ १६ मिनिटांत! बंदरे विकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची माहिती

तारापोरवाला मत्स्यालयाचा होणार कायापालट; ९०० कोटींचा प्रकल्प; ३८,००० मासे व स्कुबा डायव्हिंग; ऑक्टोबरमध्ये भूमिपूजनाची शक्यता

सरसकट कर्जमाफीवर शिक्कामोर्तब; २०१९ च्या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना नियमित लाभ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

एसटीच्या २१३ जागांच्या विकासाला 'हिरवा कंदील'; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

FIFA World Cup 2026 : पाऊले चालती अंतिम फेरीची वाट...; दुसऱ्या उपांत्य सामन्यात मेस्सीच्या अर्जेंटिनासमोर केनच्या इंग्लंडचे आव्हान