प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

आंतरराष्ट्रीय स्तरावर 'माईस'ला प्रोत्साहन; पर्यटनासाठी महाराष्ट्र सज्ज; ६.६२ कोटी रुपयांचा निधी मंजूर

महाराष्ट्र राज्याला जागतिक स्तरावर एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 'माईस' (व्यावसायिक) पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि राज्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठे कार्यक्रम आकर्षित करण्यासाठी ६ कोटी ६२ लाख ८० हजार ५०० रुपये इतक्या मोठ्या निधीला पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने मंजुरी दिली आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र राज्याला जागतिक स्तरावर एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 'माईस' (व्यावसायिक) पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि राज्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठे कार्यक्रम आकर्षित करण्यासाठी ६ कोटी ६२ लाख ८० हजार ५०० रुपये इतक्या मोठ्या निधीला पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने मंजुरी दिली आहे.

व्यावसायिक बैठका, प्रोत्साहनपर दौरे, परिषदा आणि मोठ्या प्रदर्शनांच्या माध्यमातून होणाऱ्या पर्यटनाला 'माईस' पर्यटन म्हटले जाते. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांमध्ये अशा जागतिक दर्जाच्या आयोजनांसाठी मोठी क्षमता आहे. याचाच फायदा घेत राज्याची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा सरकारचा विचार आहे.

विदेशी संस्थांशी भागीदारी या मोहिमेसाठी राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या 'इंटरनॅशनल काँग्रेस अँड कन्व्हेन्शन असोसिएशन' आणि 'जॉइंट मीटिंग्ज अँड इव्हेंट्स कन्सल्टन्सी' या नामांकित संस्थांशी भागीदारी केली आहे. या संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करणे आणि जागतिक बाजारपेठेत राज्याचा प्रचार करणे सोपे होणार आहे. निधीचा विनियोग आणि अंमलबजावणी पर्यटन धोरण-२०२४ अंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला असून २०२५ २६ साली या आर्थिक वर्षात तो खर्च केला जाईल. या संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यटन संचालनालयाच्या मुख्य लेखाधिकाऱ्यांची 'आहरण व संवितरण अधिकारी' म्हणून तर सहसंचालकांची 'नियंत्रण अधिकारी' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रात केवळ पर्यटकांची संख्याच वाढणार नाही, तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आणि परकीय चलन मिळण्यासही मदत होणार आहे, असा विश्वास पर्यटन विभागाने व्यक्त केला आहे.

Thane : पाणी बिल थकबाकीसाठी पालिकेची मोहीम तीव्र; १५ दिवसांत ९.८८ कोटींची वसुली

अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण; दिल्लीतील मेट्रो स्थानकाचे नामांतर, आता 'श्री राम मंदिर मयूर विहार' अशी नवी ओळख

Mumbai : बुरखा घालून लेडीज डब्यात शिरला पुरुष; जाब विचारताच धावत्या लोकलमधून उडी मारून पलायन, RPF कडून गुन्हा दाखल

समृद्धी महामार्गावरील नागपूर ते दक्षिण मुंबई प्रवास होणार सुलभ; ठाण्यातून थेट कोस्टल रोडला जोडणार नवीन मार्ग

Mumbai : बेलासिस पुलाचे सुरक्षा प्रमाणपत्र जारी; पश्चिम रेल्वेची माहिती