नावातील बदल अर्जाना स्वयंचलित मंजुरी; डिजिटल ग्राहक सेवेत महावितरणचे एक पाऊल पुढे एआयने बनवलेली प्रतिमा
मुंबई

नावातील बदल अर्जाना स्वयंचलित मंजुरी; डिजिटल ग्राहक सेवेत महावितरणचे एक पाऊल पुढे

दर्जेदार व तत्पर ग्राहक सेवेसाठी महावितरणने वीजबिलांच्या ग्राहक नावातील बदल करण्याच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यास सुरुवात केली आहे. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून प्रक्रिया शुल्काचा भरणा केल्यानंतर केवळ तीन ते सात दिवसांमध्ये वीजबिलावरील ग्राहक नावामध्ये बदलाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यापूर्वी या प्रक्रियेस कृती मानकानुसार एक महिन्याचा कालावधी लागत होता.

Swapnil S

मुंबई : दर्जेदार व तत्पर ग्राहक सेवेसाठी महावितरणने वीजबिलांच्या ग्राहक नावातील बदल करण्याच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यास सुरुवात केली आहे. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून प्रक्रिया शुल्काचा भरणा केल्यानंतर केवळ तीन ते सात दिवसांमध्ये वीजबिलावरील ग्राहक नावामध्ये बदलाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यापूर्वी या प्रक्रियेस कृती मानकानुसार एक महिन्याचा कालावधी लागत होता.

खरेदी-विक्री, वारसा हक्क किंवा इतर कारणांमुळे घर किंवा इतर मालमत्तेच्या मालकीमध्ये बदल झाल्यानंतर वीजबिलाच्या ग्राहक नावात बदल करण्यासाठी अर्ज करण्यात येतो.

या प्रक्रियेसाठी महावितरण मोबाईल ॲप व www.mahadiscom.in या संकेतस्थळावर वीज ग्राहकांना ‘लॉगइन’द्वारे ऑनलाइन अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे व प्रक्रिया शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

अशी असेल प्रक्रिया

ग्राहक नावात बदल करण्याचा ऑनलाइन अर्ज व अपलोड केलेल्या कागदपत्रांची संबंधित उपविभाग कार्यालयाकडून तपासणी होईल. त्यात काही त्रुटी आढळल्यास संबंधित ग्राहकांना लगेचच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येईल. सोबतच ग्राहक नावात बदल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेशही ग्राहकांना पाठविण्यात येईल. ग्राहक नावात बदल करण्याच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी मिळणार असल्याने प्रामुख्याने घरगुती ग्राहकांसह इतर ग्राहकांना महावितरणच्या डिजिटल सेवेचा तत्पर लाभ होणार आहे.

Women’s World Cup : ऐतिहासिक विजेतेपदाचे लक्ष्य; भारत-दक्षिण आफ्रिका महिला संघांत आज अंतिम लढत

Mumbai : एल्फिन्स्टन पूलाचे पाडकाम आज रात्रीपासून

Maharashtra Rain : पाऊस सुरूच राहण्याची शक्यता

Satyacha Morcha Mumbai : मविआचा एल्गार; उद्धव, राज, शरद पवार यांच्यासह विरोधकांचे शक्तिप्रदर्शन

Satyacha Morcha : मुंबईत सत्याचा जयघोष! सीएसएमटी स्थानक परिसर घोषणांनी दणाणला; हजारोंच्या संख्येने पक्षांचे कार्यकर्ते सहभागी