मुंबई

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात मोठे फेरबदल; ५८ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. ५८ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून १९ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसह बदल्या करण्यात आल्या आहेत.

Swapnil S

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. ५८ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून १९ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसह बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांना पोलिस महासंचालकपदी बढती देण्यात आला असून त्यांच्याकडे होमगार्डचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पुणे शहरचे आयुक्तपद देण्यात आले आहे. अमितेश कुमार यांच्या जागी वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रवींद्र कुमार सिंघल यांची नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे पोलीस सहआयुक्त दत्ता कराळे यांची नाशिक परिक्षेत्राच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोलीचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांची नक्षलवादविरोधी कारवायांसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून पदोन्नती दिली असून मुंबई पोलिस उपायुक्त अजय यांची जालना जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सीबीआयच्या क्लीन चिटनंतर मुंबईचे माजी डीसीपी ईओडब्ल्यू पराग मणेरे यांचे पुनर्वसन ठाणे शहर पोलिसात करण्यात आले आहे. मुंबई पोलीस वाहतूक प्रमुख प्रवीण पडवळ यांची आयजीपी ट्रेनिंग आणि स्पेशल ऑपरेशन्स आणि आयजीपी एटीएस अनिल कुंभारे यांची वाहतूक पोलीस सह पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस अतिरिक्त आयुक्त वीरेंद्र मिश्रा यांची आयजीपी संभाजी नगर परिक्षेत्र म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे तर पुणे पोलीस अतिरिक्त आयुक्त रंजन कुमार शर्मा यांची आयजीपी राज्य आर्थिक गुन्हे शाखा म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. नाशिक ग्रामीणचे एसपी शहाजी उमाप यांना अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली असून मुंबई पोलीस विशेष शाखेत तर मुंबई पोलीस डीसीपी मनोज पाटील यांची पुणे पोलीस अतिरिक्त आयुक्तपदी आणि मुंबई पोलीस डीसीपी महेश्वर रेड्डी यांची एसपी जळगाव येथे बदली करण्यात आली आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video