Mumbai : ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे तरुणाचा मृत्यू; चार मित्रांसह ५ जणांवर गुन्हा दाखल 
मुंबई

Mumbai : ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे तरुणाचा मृत्यू; चार मित्रांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

मालाड पूर्व येथे ड्रग्सच्या अतिसेवनामुळे २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. अमन सोनी (रा. कुरार) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिनिधी

मेघा कुचिक/मुंबई

मालाड पूर्व येथे ड्रग्सच्या अतिसेवनामुळे २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. अमन सोनी (रा. कुरार) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी चार जण सोनीचे मित्र आहेत. तर एकाची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी आरोपींची नावे अद्याप उघड केलेली नाहीत.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सोनीच्या मित्रांनी त्याला फोन करून बोलावून घेतले आणि नंतर कुरार पूर्वमधील पालिकेच्या बागेत नेले, जिथे त्यांनी त्याला बळने किंवा परस्पर ड्रग्सचे अनेक इंजेक्शन टोचल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. इंजेक्शन दिल्यानंतर त्याची प्रकृती खालावली, परंतु मित्रांनी त्याला वेळेवर वैद्यकीय मदत मिळवून दिली नाही, असेही सांगितले.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'डॉक्टरांनी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी उपस्थित मित्रांना चौकशीसाठी बोलावून एफआयआर नोंदवला.' सोनीच्या मित्रांनी त्याला बागेत नेऊन ड्रग्सचे अनेक इंजेक्शन दिल्याचे कुटुंबीयांनी आरोप केला आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तरुण वेदनेने विव्हळताना आणि नशेत असल्यासारखा दिसत असून त्याच्या आसपास काही तरुण उभे असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या मृत्यूमागची नेमके सत्य समोर येईल.

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, सोनीला ड्रग्जचे व्यसन जडले होते, परंतु मित्रांसोबत झालेल्या भांडणानंतर त्याने त्याचे सेवन करणे सोडले होते. काही दिवसांनी त्याच्या मित्रांनी त्याला पुन्हा सोबत नेले आणि ही दुर्घटना घडली. काही मित्र घटनेच्या वेळी नशेत असल्याचा दावाही कुटुंबीयांनी केला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्यावर पाणीसंकट! १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा विभागाचा निर्णय

तांदूळ, ज्वारी, तूर, हरभरा कडाडला; दिवाळीच्या तोंडावर किराणा बजेट कोलमडणार

MPSC च्या आजी-माजी अध्यक्षांची न्यायालयीन चौकशी; मुख्यमंत्री फडणवीस यांची राज्यपालांना शिफारस

हरदीप पुरी, स्मृती इराणी यांचे पत्ते कट; उत्तर प्रदेशातून राज्यसभेसाठी भाजपचे आठ उमेदवार जाहीर

'इंडिगो'चा प्रवास महागला; देशांतर्गत किमान ३७५, तर कमाल १३०० रुपयांची भाडेवाढ