Instagram
मुंबई

Malaika Arora Father: मलायका अरोराच्या वडिलांनी केली आत्महत्या; इमारतीच्या छतावरुन उडी मारुन संपवलं जीवन

Malaika Arora: अनिल अरोरा यांनी वांद्रे येथील राहत्या इमारतीच्या छतावरुन उडी मारुन त्यांनी जीवन संपवल्याचं समजतंय.

Tejashree Gaikwad

Malaika Arora Father Death: मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेत्री मलाइका अरोरा हिच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. अनिल अरोरा यांनी वांद्रे येथील राहत्या इमारतीच्या छतावरुन उडी मारुन जीवन संपवल्याचं समजतंय. ही घटना समजताच मुंबई पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, अरोरा यांनी आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास टेरेसवरून उडी मारली. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.

मलायकाला तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी मिळाली तेव्हा ती पुण्यात होती. माहिती मिळताच ती तात्काळ मुंबईसाठी रवाना झाली. आत्महत्येमागील कारण अद्याप कळलेले नाही. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मलायकाचा माजी पती अरबाज खान कुटुंबासह घटनास्थळी पोहोचला आहे.

अनिल अरोरा हे भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते. ते प्रसिद्धीपासून दूर राहिले. अनिल अरोरा हे भारतीय सीमावर्ती फाजिल्का शहरातील पंजाबी होते तर अभिनेत्रीची आई जॉयस पॉलीकार्प मल्याळी ख्रिश्चन आहे. मलायका ११ वर्षांची असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला होता.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक