संग्रहित छायाचित्र  
मुंबई

फटाक्यांचे प्रदूषण अधिक; कबुतरप्रेमी मनेका गांधी यांचे मत

कबुतरांमुळे कधीही कोणताही अपाय झालेला नाही, उलट फटाक्यांमुळेच अधिक प्रदूषण होते, असे मत माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेत्या मनेका गांधी यांनी शनिवारी व्यक्त केले. शहरातील कबुतरखाने पुन्हा सुरू होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Swapnil S

मुंबई : कबुतरांमुळे कधीही कोणताही अपाय झालेला नाही, उलट फटाक्यांमुळेच अधिक प्रदूषण होते, असे मत माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेत्या मनेका गांधी यांनी शनिवारी व्यक्त केले. शहरातील कबुतरखाने पुन्हा सुरू होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना गांधी म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुतरखान्यांबाबत निर्णय घेण्यासाठी एक समिती नियुक्त केली असून तिचा अहवाल अनुकूलच येईल.

भारताची पायाभरणी ही दयेवर आधारित आहे; ती इतरांना जगू देण्याबद्दल आहे. कबुतरांमुळे कुणाचाही मृत्यू झाल्याचा एकही दाखला नाही. त्यांनी कधीही कोणालाही हानी पोहोचवलेली नाही, असे गांधी म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांनी यावर निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन केली आहे. यात एक महिना लागेल. अहवाल आल्यानंतर कबुतरखाने पुन्हा सुरू होतील, असा मला विश्वास आहे, असे त्यांनी नमूद केले.

रोग पसरण्यामुळे कबुतरे मारली जात असतील, तर फटाके कितीतरी पटींनी अधिक प्रदूषण करतात. भगवान राम आणि सीतेच्या काळात फटाके नव्हते. लोक दिवे लावत आणि अन्न वाटत. फटाक्यांचा काळ आता संपला आहे. लोकांना आता श्वासही घेता येत नाही, असे भाजप नेत्या म्हणाल्या.

भारताच्या पर्यटन धोरणावर टीका करताना गांधी म्हणाल्या की, बेकायदेशीर जंगलतोड आणि नैसर्गिक संपत्तीचा अवमान केल्यामुळे पर्यटनाची आकर्षकता कमी झाली आहे. भारताची पर्यटनाची भूक अनेक छोट्या देशांपेक्षा कमी आहे. तुम्ही जितकी झाडे तोडाल आणि स्थानिक संस्कृती नष्ट कराल, तितके कमी लोक येतील. जर आपण जंगलांचा आणि प्राण्यांचा आदर केला तर पाच वर्षांत चमत्कार करू शकतो, असे त्या म्हणाल्या.

गेल्या १० वर्षांत जवळपास २१ - लाख हेक्टर जमिनीवरील झाडे - तोडण्यात आल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. गेल्या महिन्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेने कबुतरांना खाऊ घालण्यास बंदी घालत काही जुने कबुतरखाने बंद केले होते. कारण, हे सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात आले होते.

समय रैनासह ५ कॉमेडियन्सना 'सर्वोच्च' दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणातील सर्व FIR रद्द

स्वातंत्र्यदिनाआधी दिल्ली उच्च न्यायालय, विमानतळासह अन्य ठिकाणी बॉम्बची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

'हस्तक्षेप करणारे तुम्ही कोण?' NALSAR प्रकरणात सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा BCI ला सवाल

ST च्या स्मार्टकार्डला उत्स्फूर्त प्रतिसाद; १ कोटीहून अधिक प्रवाशांची नोंदणी, ६४ लाखांहून अधिक कार्ड सक्रिय

अल्पवयीन मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न; ATS कडून आंतरराज्यीय नेटवर्कचा पर्दाफाश