मानखुर्द येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी क्रेन कोसळली आणि एका पोलिसाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 
मुंबई

मानखुर्दमध्ये क्रेन दुर्घटना : कंत्राटदाराला एक कोटींचा दंड

मानखुर्द येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी क्रेन कोसळली आणि एका पोलिसाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर मुंबई महापालिकेने संबंधित कंत्राटदाराला एक कोटींचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

Swapnil S

मुंबई : मानखुर्द येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी क्रेन कोसळली आणि एका पोलिसाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर मुंबई महापालिकेने संबंधित कंत्राटदाराला एक कोटींचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. दरम्यान, चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे ही ते म्हणाले.

मानखुर्द येथे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. पुलाचे काम सुरू असताना क्रेन कोसळली आणि या दुर्घटनेत पोलिसांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. संतोष चव्हाण असे मृत पोलिसाचे नाव असून ते नेहरूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मानखुर्द परिसरात सायन-पनवेल महामार्गावर उत्तरेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर उड्डाणपुलाचे बांधकाम महापालिकेकडून काम सूरू होते. या ठिकाणी वापरण्यात येणारी ड्रिलिंग मशीन रस्त्याच्या कडेला पार्क करण्यात आली होती. रात्री संतोष चव्हाण हे मार्गाने त्याच दुचाकीवरून घरी जात असताना जमीन खचली आणि क्रेन दुचाकीवरून जाणाऱ्या चव्हाण यांच्या अंगावर कोसळली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेत निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा कंत्राटदारावर दाखल केला आहे. आता मुंबई महापालिकेनेही कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून जबाबदार कंत्राटदारावर एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतल्याचे बांगर यांनी सांगितले.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग