मुंबई : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू झाले. यामध्ये हजारो आंदोलक सहभागी होणार असल्याने या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सीएसएमटी परिसरातील दुकाने आणि हॉटेल बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दिवसभर हॉटेल, दुकाने बंद राहिल्याने आंदोलकांच्या जेवणाची गैरसोय झाली. तर आंदोलन १५ दिवस चालेल याचा अंदाज घेऊन मराठा आंदोलक पंधरा दिवसांचे अन्नधान्य घेऊन आझाद मैदान परिसरात दाखल झाले आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानात एक दिवसाचे आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार राज्यभरातील हजारो मराठा बांधव रात्रीपासूनच आझाद मैदान परिसरात दाखल होत होते. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच आझाद वेळापत्रक कोलमडले, अनेक बसेस ३०-४५ मिनिटे उशिरा धावत होत्या.
मी समर्थकांना साद घातली आहे. मुंबईकरांना त्रास होईल, असे काम करू नका. मुंबई ही ट्राफिकफ्री करा, असे आवाहन मी समर्थकांना करत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माघार नाही. गोळ्या घातल्या तरी चालेल, पण आरक्षण घेऊनच जाणार.मनोज जरांगे
मैदान परिसरात मोठी गर्दी झाली होती. रस्त्यांवर मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करण्यात आली होती. यामुळे सकाळपासूनच महापालिका मार्ग आणि दादाभाई नैरोजी मार्ग, हजारीमल सोमाणी मार्ग पूर्णतः ठप्प झाले. यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली.