मुंबई

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदार आले एकत्र ; मंत्रालयाला लावलं टाळं...

नवशक्ती Web Desk

मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक झाले आहेत. राज्यात जागोजागी आंदोलन, प्रचार सुरु आहेत. काल नवले पुलावर आंदोलकांनी रस्ता अडवून ठेवला होता. आता आंदोलक आज मुंबईत येऊन पोहचले आहेत. आज मंत्रालयासमोर सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन केलं आहे. त्याचबरोबर या आमदारांनी मंत्रालयाला टाळं देखील ठोकलं आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय सरकार देतं नाही, तोपर्यंत मंत्रालयाच कामकाज चालू न देण्याचा इशारा या आमदारांनी दिला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सर्वपक्षीय आमदार मंत्रालयासमोर आंदोलन करत आहेत. यावेळी आमदारांकडून मंत्रालयालाला टाळं लावण्यात आलं आहे. कोणत्याही मंत्र्याला आम्ही मंत्रालयात जाऊ देणार नाही. मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा, अशी मागणी सगळे आमदार करत आहेत.

मुंबईतील मंत्रालयाच्या परिसरात सध्या सर्वपक्षीय आमदार आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केलं आहे. या आंदोलनामध्ये राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके, बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्रानी, मोहन उबर्डे हे आमदार मंत्रालयाच्या समोर आंदोलन करत आहेत.

आरक्षणासंदर्भात ताबोडतोब विशेष आधिवेशन बोलवावं अशी मागणी या आमदारांची आहे, यावेळी आंदोलन करणाऱ्या आमदारांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 'महिला आरक्षणाकरिता संसदेचे विशेष आधिवेशन बोलवलं होत त्यावर तोडगा देखील निघाला होता , त्याप्रमाणे महाराष्ट्र विधानसभेन एक दिवसाचे अतितात्काळ आधिवेशन बोलवावं, मराठा आंदोलनाच्या संदर्भात ज्या मराठा समाजाच्या भावना आहेत, मागण्या आहेत त्या पुर्ण कराव्यात. यासाठी आम्ही मंत्रालयाला टाळं ठोकलं आहे.'

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस