मुंबई

मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

गणेशोत्सवाची लगबल सुरु झाल्याने अनेकांना मुंबईबाहेर जाण्याची घाई झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत

नवशक्ती Web Desk

गणेशोत्सवासाठी अनेक चाकरमानी मुंबईबाहेर पडत आहेत. मुंबई-गोवा महामार्गानंतर आता मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. या महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक मंदावली आहे. अमृतांजन पुलाजवळ वाहनं कासव गतीने पुढे सरकत आहेत. यात आज रविवार असल्याने कोणाला पर्यटनस्थळी जायंच आहे तर कोणाला गणेशोत्सवासाठी गावी जायचं आहे. पण सध्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

गणेशोत्सवाची लगबल सुरु झाल्याने अनेकांना मुंबईबाहेर जाण्याची घाई झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ट्रॅफिक जॅम झाल्याने वाहनचालक त्रस्त झाल्याचं दिसून येत आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबईबाहेर जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मुंबई-गोवा महामार्गावर आणि त्यानंतर आता मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबचं लांब रांगा लागल्याचं दिसून येत आहे. सकाळपासून चाकरमान्यांनी शहराबाहेर पडण्यास सुरुवात केल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली, यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येत आहे. इंदापूर, माणगाव नजीक वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे वाहनचाकल देखील त्रस्त झाले आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित शिक्षकांना दिलासा; ३ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण घेता येणार

एसटी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठे पाऊल; सहा आठवड्यांत चौकशी पूर्ण करत अहवाल सादर करणे बंधनकारक

जळगाववरून आता दररोज विमानसेवा सुरू; जळगाव-मुंबई आणि जळगाव-अहमदाबाद प्रवासी सेवा

कल्याणमध्ये उद्या पाणीपुरवठा ठप्प