मुंबई

मयंक लोहार लोकल हत्याकांड : पोलिसांना अद्याप खुनासाठी वापरलेला चाकू सापडेना; १० ते १२ जणांचे जबाब नोंदवले

चर्चगेट-नालासोपारा जलद लोकलमध्ये २३ जूनला झालेल्या धक्कादायक हत्याकांडाचा तपास सध्या बोरिवली लोहमार्ग पोलीस करत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत १० ते १२ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. मात्र, आरोपी रोशन सुवर्णा याने मयंक लोहारवर ज्या चाकूने वार केले तो चाकू अद्याप पोलिसांना सापडलेला नाही.

Swapnil S

मेघा कुचिक/मुंबई

चर्चगेट-नालासोपारा जलद लोकलमध्ये २३ जूनला झालेल्या धक्कादायक हत्याकांडाचा तपास सध्या बोरिवली लोहमार्ग पोलीस करत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत १० ते १२ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. मात्र, आरोपी रोशन सुवर्णा याने मयंक लोहारवर ज्या चाकूने वार केले तो चाकू अद्याप पोलिसांना सापडलेला नाही.

मुंबईत २३ जूनला अंधेरी आणि बोरिवली स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधील प्रथम श्रेणीच्या डब्यात मयंक लोहार (२२) याची रोशन सुवर्णा (३०) याने पोटावर आणि छातीवर वार करून हत्या केली होती. याबाबत वरिष्ठ जीआरपी अधिकाऱ्याने सांगितले, 'आरोपीने गुन्हा केल्यानंतर ज्या चाकूने हत्या केली, तो त्याने फेकून दिला असावा. त्याचा आम्ही शोध घेत आहोत. आरोपीचे रक्ताने माखलेले कपडे आणि बॅग आम्ही आधीच हस्तगत केली आहे.

'क्राइम सीन' पुन्हा तयार करण्याची गरज नाही

घटनेचे व्हिडीओ फुटेज उपलब्ध असल्यामुळे गुन्ह्याचा 'क्राइम सीन' पुन्हा तयार करण्याची गरज नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 'जेव्हा घटना स्पष्ट नसते किंवा पुराव्यांचा अभाव असतो, तेव्हाच क्राइम सीन रिक्रिएशन केले जाते. मात्र, या प्रकरणात सर्व काही सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे,' असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले. दरम्यान, बोरिवली महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सुरक्षेबाबत जनजागृती मोहीम राबवणार

शुक्रवारी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त राकेश कलसागर यांनी बोरिवली जीआरपी स्टेशनला भेट दिली. यावेळी त्यांनी आरोपीची स्वतः चौकशी केली आणि रेल्वे सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यानंतर जीआरपीने रेल्वे सुरक्षेबाबत जनजागृती मोहीम राबवण्याची घोषणा केली.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : सोमवारपासून मध्य रेल्वेवर आणखी १२ एसी लोकल; वातानुकूलित सेवांची संख्या १२० होणार

भाजपमुक्त रामासाठी आता रस्त्यावर आंदोलन - उद्धव ठाकरे

TET चाही पेपर फुटला; आज होणारी परीक्षा रद्द; मुख्य आरोपी अद्याप फरार

केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांना त्यांच्याच मंत्रालयातर्फे ९९ लाखांचे अनुदान

देशात तेलाचे दर कधी कमी करणार? काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा सवाल