प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

Mira-Bhayandar : बालवाडी शिक्षिकांवर प्राथमिक विद्यार्थ्यांची जबाबदारी; महापालिकेच्या निर्णयाला शिक्षिकांचा विरोध

मीरा-भाईंदर महापालिकेने महापालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत २४ बालवाडी शिक्षिकांना महापालिका शाळांतील प्राथमिक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नियुक्ती केली आहे. मात्र, या शिक्षिकांकडे डी.एड. किंवा बी.एड. पदवी नसल्यामुळे ही नियुक्ती योग्य नाही, असा शिक्षिकांचा आरोप आहे.

Swapnil S

भाईंंदर : मीरा-भाईंदर महापालिकेने महापालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत २४ बालवाडी शिक्षिकांना महापालिका शाळांतील प्राथमिक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नियुक्ती केली आहे. मात्र, या शिक्षिकांकडे डी.एड. किंवा बी.एड. पदवी नसल्यामुळे ही नियुक्ती योग्य नाही, असा शिक्षिकांचा आरोप आहे.

शहरातील बालवाडी शिक्षिकांना शासन निर्णयानुसार सकाळी ४ तास बालवाडीतील मुलांना शिकवण्याची जबाबदारी असते. उरलेले ४ तास त्या शासकीय व पालिकेच्या विविध मोहिमा राबवण्यासाठी आणि सर्वेक्षणासाठी देण्यात येतात. मात्र महापालिकेने नुकतीच आदेश जारी करून या बालवाडी शिक्षिकांना इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या प्राथमिक विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी दिली आहे.

बालवाडी शिक्षिका शिक्षण विभागात नसल्यानं त्यांना महापालिकेकडूनच वेतन मिळते. त्यामुळे महापालिकेचा हा आदेश बेकायदेशीर असल्याचा शिक्षिकांचा आरोप आहे. आदेशानुसार, सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत बालवाडीतील मुलांना शिकवायचे आहे, तर दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महापालिका शाळांतील प्राथमिक विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे. परंतु या शिक्षिकांकडे डी.एड. किंवा बी.एड. पदवी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देणे शक्य होणार नाही, असा विरोध त्यांनी व्यक्त केला आहे.

१५० शिक्षक कार्यरत

महापालिकेच्या शिक्षण विभागात सुमारे १५० शिक्षक कार्यरत आहेत, ज्यांना ५० टक्के शासकीय अनुदान आणि ५० टक्के महापालिकेकडून वेतन मिळते. मात्र, अनुभव नसलेल्या बालवाडी शिक्षिकांना प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी देणे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी धोकादायक ठरण्याची चिन्हे आहेत. महापालिकेने या शिक्षिकांना प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू केली आहे, तरीही अनुभवी शिक्षकांशिवाय विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे शिकवणे कठीण असल्याचे सांगितले जाते. शिक्षिकांचा विरोध सुरू असून, प्रशासनाकडून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र प्रशासनात मोठा बदल; राजेश अग्रवाल यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती

निवडणुका होणारच, पण...; सर्वोच्च न्यायालयाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा निर्णय

२ डिसेंबरच्या निवडणुकांसाठी सरकारचा निर्देश : मतदारांना भरपगारी रजा द्या, अन्यथा ...

Mumbai : बांधकाम प्रदूषणावर हायकोर्टाची कठोर भूमिका; नियमांच्या अंमलबजावणीसाठी नेमली ५ सदस्यांची समिती

"सीझन २ - पुन्हा मुलगी!" मराठी अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा; सोशल मीडियावर खास पोस्टसोबत दिली गुड न्यूज