Mira Bhayandar: पालिका निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मेजवानी; जेवण-नाश्त्यासाठी १ कोटी ४० लाखांचा खर्च 
मुंबई

Mira Bhayandar: पालिका निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मेजवानी; जेवण-नाश्त्यासाठी १ कोटी ४० लाखांचा खर्च

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरू असून, निवडणूक कामी नेमण्यात येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या नाश्ता-जेवणासाठी पालिकेने तब्बल १ कोटी ४० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे.

Swapnil S

भाईंंदर : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरू असून, निवडणूक कामी नेमण्यात येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या नाश्ता-जेवणासाठी पालिकेने तब्बल १ कोटी ४० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. या अनुषंगाने महापालिकेने संबंधित कामाची निविदा जाहीर केली असून, मेनूमध्ये सुकामेवा, फळांचा रस, पनीर बटर मसाला, गुलाबजाम, बिर्याणी, तसेच मच्छी-मटणाचे विविध पर्याय समाविष्ट केले आहेत. याशिवाय व्हीआयपी नाश्ता व व्हीआयपी थाळी देण्याचाही प्रस्ताव आहे.

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी नियोजन आणि व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे. निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर न झाल्यानेही निवडणुकीशी संबंधित विविध विभागांना तयारीची जबाबदारी देण्यात आली आहे. महिला व बालकल्याण समितीच्या उपायुक्त कविता बोरकर यांनी या संदर्भात निविदा प्रसिद्ध केली आहे. महापालिकेने ही निविदा सर्वांसाठी खुली ठेवली असून महिला बचत गट किंवा महिला संस्थांना स्वतंत्र प्राधान्य देण्यात आलेले नाही. ३० नोव्हेंबरपर्यंत निविदा भरता येणार असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निविदा उघडल्या जाण्याची शक्यता आहे.

निवडणूक कामाची जबाबदारी दिलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नाश्ता व जेवणाची संपूर्ण जबाबदारी महिला व बालकल्याण विभागाला देण्यात आली आहे. निवडणूक प्रशिक्षणावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांना नाश्ता दिला जातो. मतदानाच्या दिवशी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना नाश्ता-जेवण पुरवले जाते, तर मतमोजणीच्या दिवशी जेवण देण्यात येते. साधारणपणे अंदाजे ६ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
सुनील यादव, अधीक्षक आस्थापना विभाग पालिका

१ कोटी ४० लाखांचा मेनू

  • पेय मेनू : साधा चहा, स्पेशल चहा, कॉफी, दुधाचा ग्लास, मिल्कशेक, ताज्या फळांचा रस.

  • नाश्ता मेनू : उकडलेली अंडी, ऑम्लेट सॅन्डविच, कांदेपोहे, गोड शिरा, उपमा, इडली, मेदूवडा-सांबार, वडापाव, सामोसा, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, उत्तम प्रतीचा सुकामेवा, तसेच सफरचंद, पेरू, वेलची केळी, द्राक्षे, संत्री असे ताज्या फळांचे पर्याय.

  • शाकाहारी दुपारचे जेवण : पनीर भाजी, बटाटा भाजी, वरण, भात, भाकरी, चपाती, पुरी.

  • मांसाहारी मेनू : अंडाकरी, मटण, चिकन, तसेच पापलेट, सुरमई, कोळंबी, बांगडा, बोंबील या माशांचे विविध पदार्थ.

  • रात्रीचे जेवण : व्हेज पुलाव, व्हेज बिर्याणी, मिक्स व्हेज, गुलाबजाम.

  • व्हीआयपी नाश्ता : चीज टोस्ट सॅन्डविच, ब्रेड–बटर–जॅम.

  • व्हीआयपी थाळी : पनीर बटर मसाला, मिक्स व्हेज कोल्हापुरी, दालफ्राय, व्हेज पुलाव, जिरा राईस, नान, पराठा, गुलाबजाम.

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय; भारताचा कसोटी क्रिकेट इतिहासातला मोठा पराभव

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या? तुरुंगात विष दिल्याचा आरोप; कुटुंबियांवर लाठीचार्ज

केंद्रीय मंत्र्यांचा 'बॉम्बे' उच्चार; राज ठाकरेंकडून कानउघडणी, म्हणाले, 'मुंबई' नाव खटकतं कारण...

डोंबिवली : भीक मागणाऱ्या तरुणीला दिला आसरा; पाच वर्षांनी केला तिचा खून, खाडीत सुटकेसमध्ये आढळला मृतदेह, धक्कादायक Video समोर

"माझा मुलगा असा वागला असता तर..."; पंकजा मुंडेंनी घेतली गौरी गर्जेच्या कुटुंबीयांची भेट