मुंबई

तिन्ही रेल्वेमार्गावर रविवारी मेगा ब्लॉक

लोकल उशीराने धावणार आहेत.

नवशक्ती Web Desk

मुंबई : रुळांची दुरुस्ती ओव्हरहेड वायर दुरुस्ती सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार, १६ जुलै रोजी मध्य हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मेगा ब्लॉकच्या कालावधीत तिन्ही रेल्वे मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात आल्या असून, काही लोकल उशीराने धावणार आहेत.

मध्य रेल्वेच्या माटुंगा – ठाणे अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ पर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. तर ठाणे स्थानकावर धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. तर ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल ठाणे - माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येणार आहेत.

हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी -चुनाभट्टी - वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. सीएसएमटी - वडाळा स्थानकातून वाशी - बेलापूर - पनवेल स्थानकात जाणाऱ्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वडाळा रोड स्थानकातून वांद्रे - गोरेगाव स्थानकात जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर पनवेल - बेलापूर -वाशी स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव - वांद्रे स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुटणारी अप मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची परवानगी आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर राम मंदिर - बोरिवली स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत अंधेरी बोरिवली दरम्यान डाऊन व अप धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती