मुंबई

Mega block Update : मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; प्रवाशांची होणार गैरसोय

रेल्वे रूळ, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी रविवार २३ मार्च रोजी मध्य व पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक येण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी रविवार २३ मार्च रोजी मध्य व पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक येण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत दोन्ही मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

मध्य रेल्वेवर माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने अंतिम स्थानकात पोहोचतील, तर ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील.

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या पनवेल/बेलापूर/वाशी येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला आणि वाशी - पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ५ तासांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी १०:३५ ते दुपारी ३:३५ पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान सर्व जलद मार्गावरील लोकल गाड्या धीम्या मार्गावर चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील आणि काही चर्चगेट गाड्या वांद्रे/दादर स्थानकावरून शॉर्ट टर्मिनेट/रिव्हर्स केल्या जातील.

बांधकाम प्रकल्पांमुळे ठाण्याची हवा प्रदूषित; २८ ठिकाणी नियमभंग, ५.२५ लाखांचा दंड

Mumbai : रुळांवर पाणी भरण्यापासून मुक्तता; पंपिंग स्टेशन उभारणीच्या कामाला वेग; कुर्ला-सायन रेल्वे स्थानकादरम्यान प्रवाशांना दिलासा

नळाला पाणी नाही, पण बिल वाढले! पहिल्याच महासभेत उल्हासनगरकरांना पाणीपट्टीचा झटका

जाधवजी मॅन्शन बहुमजली इमारतीवर टांगती तलवार; निर्धारित उंचीपेक्षा उभारलेले वरचे मजले पाडावे लागतील, हायकोर्टाचा इशारा

तात्पुरत्या स्वरूपात कामावर ठेवलेला चालक 'कर्मचारी'च; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल