मुंबई

Megablock on Sunday : जाणून घ्या कसा असेल रविवारचा मेगाब्लॉक, एका क्लिकवर!

दर आठवड्याप्रमाणे रविवारी काही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यासंबंधित संपूर्ण माहिती...

प्रतिनिधी

विविध तांत्रिक कामांसाठी रविवारी, ६ नोव्हेंबर रोजी (Megablock on Sunday) मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, हार्बरवर पनवेल-वाशी दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच, पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री बोरिवली ते भाईंदर स्थानकादरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक आहे. त्यामुळे या मार्गावर रविवार मेगा ब्लॉक नसेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

सीएसएमटीमधून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येऊन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे योग्य डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या स्थानकांदरम्यान कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा येथे थांबतील. तसेच, सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, ठाणे-वाशी, नेरुळ लोकल फेऱ्या उपलब्ध राहतील.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले