मुंबई

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.३५ पर्यंत ब्लॉक असेल.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.३५ पर्यंत ब्लॉक असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३२ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवल्या जातील. लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. त्यापुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत अप, डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरीता सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील.

पश्चिम रेल्वेवर पाच तासांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सर्व अप आणि डाऊन जलद मार्गावरील गाड्या गोरेगाव आणि बोरिवली स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरून धावतील, तर काही अप आणि डाऊन उपनगरीय सेवा रद्द राहतील.

सुप्रीम कोर्टात WhatsAppचा यू-टर्न; युजर्सच्या संमतीशिवाय डेटा शेअरिंग नाही, स्पर्धा आयोगाच्या आदेशांची अंमलबजावणी मान्य

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेनच्या स्वप्नाला वेग; जपानमध्ये भारतीय लोको पायलटांचे विशेष प्रशिक्षण, Video व्हायरल

प्रसाधनगृहाच्या दारावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा? हरयाणातील संतापजनक प्रकार, नेटकरी भडकले; Video व्हायरल

JNU मध्ये पुन्हा हिंसाचार! मध्यरात्री डाव्या-उजव्या विद्यार्थी संघटनांत धुमश्चक्री; हाणामारी, दगडफेक, धावपळीत अनेकजण जखमी

ड्रग माफिया El Mencho ठार, मेक्सिकोत उसळला हिंसाचार; महामार्ग बंद, उड्डाणे रद्द; भारतीय दूतावासाचा 'घरातच थांबा' सल्ला