मुंबई

मध्य व हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर नो ब्लॉक

नवशक्ती Web Desk

मुंबई : रुळांची दुरुस्ती ओव्हरहेड वायर दुरुस्ती सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार ३ सप्टेंबर रोजी मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मेगा ब्लॉकच्या कालावधीत काही लोकल उशीराने धावणार असून काही लोकल रद्द करण्यात येतील, असे मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक नसल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील लोकल माटुंगा - मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. तर ठाणे स्थानकातून अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड - माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

हार्बर मार्गावर मानखुर्द-नेरुळ अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून पनवेल, बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील लोकल आणि बेलापूर स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेला जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ब्लॉक कालावधीत सीएसएमटी - मानखुर्द या भागावर विशेष उपनगरीय लोकल चालविण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी, नेरुळ स्थानकावरील ट्रान्सहार्बर लाईन सेवा आणि मेन लाईन सेवा सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत उपलब्ध असतील.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट? RBI च्या नव्या सुविधेने काय बदलणार? जाणून घ्या सविस्तर

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

SRA कडून ४५० हून अधिक निष्क्रिय विकासकांची हकालपट्टी

Ganeshotsav 2026 : मुंबईकरांना घरबसल्या मिळणार उकडीचे अन् तळलेले मोदक; BMC च्या महिला बचत गटांचा खास उपक्रम