Ganeshotsav 2026 : मुंबईकरांना घरबसल्या मिळणार उकडीचे अन् तळलेले मोदक; BMC च्या महिला बचत गटांचा खास उपक्रम

गणेशोत्सवात मोदकांना असलेली मोठी मागणी लक्षात घेऊन पालिकेने नागरिकांसाठी घरपोच मोदक उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू केली आहे.
Ganeshotsav 2026 : मुंबईकरांना घरबसल्या मिळणार उकडीचे अन् तळलेले मोदक; BMC च्या महिला बचत गटांचा खास उपक्रम
Ganeshotsav 2026 : मुंबईकरांना घरबसल्या मिळणार उकडीचे अन् तळलेले मोदक; BMC च्या महिला बचत गटांचा खास उपक्रम
Published on

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांच्या आवडत्या मोदकांची मेजवानी यंदा थेट घरपोच मिळणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 'मोदक महोत्सव २०२६' चे आयोजन करण्यात आले असून, पालिकेच्या सहकार्याने कार्यरत असलेल्या महिला बचत गटांकडून तयार करण्यात येणारे पारंपरिक उकडीचे आणि तळलेले मोदक नागरिकांना घरबसल्या मागवता येणार आहेत.

Ganeshotsav 2026 : मुंबईकरांना घरबसल्या मिळणार उकडीचे अन् तळलेले मोदक; BMC च्या महिला बचत गटांचा खास उपक्रम
Ganesh Chaturthi 2026 : यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पासाठी ट्राय करा 'हे' स्पेशल मोदक; जाणून घ्या रेसिपी

गणेशोत्सवात मोदकांना मोठी मागणी असते. हीच मागणी लक्षात घेऊन पालिकेने नागरिकांसाठी घरपोच मोदक उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू केली आहे. यासाठी नागरिकांना https://shgeshop.com संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या नागरिकांना १४ सप्टेंबरपासून त्यांच्या घरापर्यंत मोदक पोहोचवले जाणार आहेत. ही सुविधा केवळ मुंबई महानगरपालिका हद्दीत उपलब्ध असेल.

मोदक महोत्सव संपूर्ण गणेशोत्सवाच्या कालावधीत सुरू राहणार आहे. घरपोच मोदक मागवण्यासाठी नागरिकांनी किमान एक दिवस आधी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना घराबाहेर न पडता पारंपरिक चवीच्या मोदकांचा आस्वाद घेता येणार आहे.

या उपक्रमामुळे मुंबईकरांना दर्जेदार मोदक उपलब्ध होण्यासोबतच महिला बचत गटांना आपल्या उत्पादनांसाठी मोठी बाजारपेठ मिळणार आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या व्यवसायाच्या संधी वाढवणे, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे.

Ganeshotsav 2026 : मुंबईकरांना घरबसल्या मिळणार उकडीचे अन् तळलेले मोदक; BMC च्या महिला बचत गटांचा खास उपक्रम
पान-गुलकंदाचा स्वाद अन् मोदकाची गोडी; नक्की ट्राय करा 'ही' सोपी रेसिपी

याबाबत संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी सांगितले की, मोदक महोत्सवामुळे गणेशोत्सवाचा आनंद वाढण्यास मदत होणार असून, मुंबईकरांना महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना पाठिंबा देण्याची संधीही मिळणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in