मुंबई

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक

Swapnil S

मुंबई : रुळांची दुरुस्ती ओव्हरहेड वायर दुरुस्ती सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार, ११ फेब्रुवारी रोजी मध्य हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीच्या कालावधीत तिन्ही मार्गांवरील लोकल उशिराने धावत असून, काही लोकल रद्द करण्यात आल्याचे मुंबई उपनगरीय रेल्वेकडून सांगण्यात आले.

मध्य रेल्वेच्या माटुंगा-ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ पर्यंत दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत, तर शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान थांबतील. तर कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा ठाणे -माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. तर ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ-गोरेगाव स्थानकादरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत सांताक्रुझ- गोरेगाव स्थानकादरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

बेलापूर-उरण आणि नेरूळ-उरण सेवा प्रभावित नाही

(नेरूळ/बेलापूर-उरण पोर्ट मार्ग वगळून) या कालावधीत पनवेल स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या आणि सीएसएमटी स्थानकातून पनवेल, बेलापूरला जाणाऱ्या लोकल सेवा बंद आहे.

सीएसएमटी-वाशी दरम्यान विशेष लोकल!

हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी स्थानकादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येत आहे, तर ठाणे-वाशी-नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बरवर लोकल उपलब्ध आहेत. तर बेलापूर- नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्टलाईन सेवा उपलब्ध असेल.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस