मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेचा बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी) हा ‘२ अ’ टप्पा अखेर शनिवारपासून (ता.१०) प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या सेवेचा शुभारंभ शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रोचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. आरे ते बीकेसी पहिला टप्पा गतवर्षी प्रवाशांच्या सेवेत आला. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक या स्थानकांचे काम पूर्ण झाल्यानंतर गेले काही दिवसांपासून सुरक्षा चाचणी सुरु होत्या. विविध चाचण्या पूर्ण झाल्याने अखेर हा टप्पा शनिवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवून बीकेसी ते सिद्धिविनायक स्टेशनपर्यंत मेट्रोने प्रवास करणार आहेत.