मुंबई

अंतिम चाचणीनंतरच मेट्रो ३ सेवेत येणार, भाजप नेत्याने केलेली पोस्ट केली डिलीट

मुंबईतील पहिल्या भूमिगत कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गाचा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा २४ जुलै रोजी सुरू होणार असल्याचे ट्विट भाजप नेते विनोद तावडे यांनी केले होते

Swapnil S

मुंबई : मुंबईतील पहिल्या भूमिगत कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गाचा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा २४ जुलै रोजी सुरू होणार असल्याचे ट्विट भाजप नेते विनोद तावडे यांनी केले होते; मात्र अद्यापही मेट्रो ३ च्या मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांमार्फत अंतिम चाचणी प्रलंबित असल्याने ही चाचणी पूर्ण झाल्यानंतरच मेट्रो ३ प्रवाशांच्या सेवेत येईल, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.

अंतिम चाचणी झाली नसल्याने तावडे यांनी आपली पोस्ट डिलीट केली.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भूमिगत मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. आरे ते बिकेसी या पहिल्या टप्यातील मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन प्रयत्नशील आहे. पहिल्या टप्यातील आरडीएसओ चाचण्या पूर्ण झाल्या असून आता मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांमार्फत अंतिम चाचणी घेण्यात येणार आहे.

या चाचणीत यशस्वी झाल्यानंतर मेट्रो प्रवाशांच्या सेवेत येईल. मात्र आज सकाळी भाजप नेते विनोद तावडे यांनी २४ जुलै रोजी मेट्रो ३ सुरू होईल, असे ट्विट केले होते; मात्र त्यांनी हे ट्विट डिलीट केले.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता, त्यांनी अंतिम चाचणीनंतरच मेट्रो सुरू होईल, असे स्पष्ट केले.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश