मुंबई

म्हाडा सरळ सेवा भरतीतील यशस्वी उमेदवारांची यादी जाहीर

प्रतिनिधी

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळ सेवा भरती-२०२१ अंतर्गत आयोजित ऑनलाईन परीक्षेतील यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीकरिता संवर्गनिहाय सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सदर जाहीर सूचीतील सहायक विधी सल्लागार, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, भूमापक, अनुरेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी ९ व १० जून या दोन दिवसांच्या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात केली जाणार आहे. तसेच कागदपत्र पडताळणीच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत सहायक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी १४ ते १७ जून या चार दिवसांच्या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात केली जाईल.

कागदपत्र पडताळणीच्या सूचीमध्ये नाव असलेल्या सहायक विधी सल्लागार, मिळकत व्यवस्थापक अधिकारी या संवर्गातील यशस्वी उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी विहित केलेल्या दिवशी कक्ष क्रमांक २१५, पहिला मजला, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे पूर्व, मुंबई येथे उपस्थित राहावे, असे आवाहनही म्हाडा प्रशासनाने केले आहे. सरळ सेवा भरतीतील यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीसाठीचे संवर्गनिहाय वेळापत्रक म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

गिलचा पुन्हा शतकी नजराणा; चौथ्या दिवसअखेर भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर

जुलै महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल