मुंबई

अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Swapnil S

मुंबई : अपहरण केलेल्या एका १५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नरेश रामआशिष राय या आरोपीस बिहारहून आरसीएफ पोलिसांनी अटक केली. यावेळी त्याच्या तावडीतून पीडित मुलीची सुटका करण्यात आली आहे. नरेशविरुद्ध अपहरणासह लैंगिक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून, याच गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

विशेष म्हणजे, मुलीच्या अपहरणानंतर नरेशने त्याला अटक करून दाखवाच, असे आव्हान दिले होते. यातील तक्रारदार चेंबूर येथे राहत असून, त्यांचा स्वत:चा जरीचा कारखाना आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यांत त्यांच्या १५ वर्षांच्या मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल होताच तिचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक केदारी पवार यांच्यासह त्यांचे पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे, पोलीस उपनिरीक्षक रमेश खपाले, पोलीस हवालदार अनिल घरत, प्रीतम पाटील यांनी शोध सुरू केला होता. तपासादरम्यान नरेश हा त्यांच्या कारखान्यात कामाला होता. त्यानेच तिचे अपहरण केल्याचे उघडकीस आले होते. त्याचा शोध सुरू असताना तो सतत स्वत:चे अस्तित्व बदलून राहत होता. दिल्ली, काठमांडू आणि नंतर बिहारला तो पीडित मुलीसोबत राहत होता.

याच दरम्यान त्याने मुंबई पोलिसांना त्याला पकडून दाखवा, असे आव्हान दिले होते. त्यामुळे आरसीएफ पोलिसांचे एक विशेष पथक अलीकडेच बिहारला गेले होते. या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून अखेर नरेशला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच तक्रारदाराचे मुलीचे अपहरण करून तिला लग्नाचे आमिष दाखविले होते. तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली होती. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी पीडित मुलीची सुखरूप सुटका केली होती. अटकेनंतर नरेशसह पीडित मुलीला मुंबईत आणण्यात आले होते. पीडित मुलीची मेडिकल करण्यात आली असून, तिला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले होते. दुसरीकडे अटकेत असलेल्या नरेशला विशेष पोक्सो न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलिसांनी अटक केली. १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून नरेशने मुंबई पोलिसांनी पकडण्याचे आव्हान दिले.

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

काय सांगता? एप्रिलमध्ये तब्बल ३ लाख लोकांनी खरेदी केली 'ही' बाईक, पाहा लिस्ट

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व