बोगस कागदपत्रांवर मिळालेल्या बांधकाम परवानगीला स्थगिती; ओस्तवाल पॅराडाईज प्रकल्पातील २३ मजली इमारतीवर कारवाई प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

बोगस कागदपत्रांवर मिळालेल्या बांधकाम परवानगीला स्थगिती; ओस्तवाल पॅराडाईज प्रकल्पातील २३ मजली इमारतीवर कारवाई

Mira Bhayandar : मीरारोड (पूर्व) येथील मीरा-भाईंदर रोडलगत असलेल्या ओस्तवाल पॅराडाईज प्रकल्पातील २३ मजली इमारतीला बोगस कागदपत्रांच्या आधारे बांधकाम परवानगी दिल्याचा आरोप असताना अखेर मीरा-भाईंदर महानगरपालिकेने या बांधकामाला स्थगिती दिली आहे. पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी हा स्थगिती आदेश जारी केला आहे.

Swapnil S

भाईंदर : मीरारोड (पूर्व) येथील मीरा-भाईंदर रोडलगत असलेल्या ओस्तवाल पॅराडाईज प्रकल्पातील २३ मजली इमारतीला बोगस कागदपत्रांच्या आधारे बांधकाम परवानगी दिल्याचा आरोप असताना अखेर मीरा-भाईंदर महानगरपालिकेने या बांधकामाला स्थगिती दिली आहे. पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी हा स्थगिती आदेश जारी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओस्तवाल पॅराडाईज इमारतीचे विकासक उमराव ओस्तवाल यांनी परिसरातील सोसायट्यांचा चटई निर्देशांक (एफएसआय) वापरून नियमबाह्य पद्धतीने २३ मजली इमारतीसाठी परवानगी घेतल्याचा आरोप आहे. या बांधकामात अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचेही निदर्शनास आले आहे. मंजूर नकाशात ६ मीटर रुंद अंतर्गत रस्ता दाखविण्यात आला असला तरी प्रत्यक्षात तो केवळ ४.२० मीटर असल्याचे आढळले. तसेच मंजूर आराखड्याच्या तुलनेत वाहनतळाची जागाही कमी असल्याचे दिसून आले आहे.

याशिवाय शेजारील इमारतींकडून आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र (कन्सेंट) न घेता नवीन यूडीपीसीआर नियमांनुसार वाढीव एफएसआय घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मीरा-भाईंदर शहरातील मीरारोड (पूर्व) येथील शिवार गार्डनसमोर मौजे भाईंदर व गोडदेव येथील सुमारे १०,५२१ चौरस मीटर जागेवर ओस्तवाल पॅराडाईज कॉम्प्लेक्समध्ये इमारत क्रमांक १ ते ८ अशी बांधकामे २००५ साली करण्यात आली होती. या इमारतींमध्ये २००८ साली सोसायट्या स्थापन झाल्या.

दरम्यान, सोसायटीकडे कन्व्हेयन्स न देता तसेच मूळ चार मजल्यांच्या परवानगीऐवजी तळ अधिक सात मजले बांधल्याचेही उघड झाले आहे. त्यापैकी पाचवा, सहावा आणि सातवा मजला अनधिकृत असल्याचे समोर आले. त्यानंतरही विकासकाने बनावट नकाशे व कागदपत्रांच्या आधारे फ्लॅटची विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी सोसायटीचे चेअरमन रंजित झा यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात बिल्डर उमराव ओस्तवाल यांना काशिमीरा गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली होती. अपीलही विकासकाने मागे घेतले. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान जागेवर आवश्यक ६ मीटर रस्ता नसून केवळ ४.२ मीटर जागा असल्याचे स्पष्ट झाल्याने अखेर पालिका आयुक्तांनी या बांधकामास स्थगिती आदेश दिला आहे.

नगरपालिकेची नोटीस

बिल्डर उमराव ओस्तवाल यांना काशिमीरा गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली होती. त्यानंतर न्यायालयातून त्यांना जामीन मिळाला असून त्या जामिनाला तक्रारदारांनी ठाणे जिल्हा न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यान, ५ डिसेंबर २०२५ रोजी महानगरपालिकेने या इमारतीला स्थगिती का देऊ नये? अशी नोटीस बजावली होती.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके