मुंबई

मीरा-भाईंदरमध्ये मतदानात सावळा गोंधळ; ईव्हीएम बिघाड, बोगस मतदानाच्या तक्रारी

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत गुरुवारी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. तरीही शहरातील अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बिघाड, मतदार यादीतील गोंधळ आणि प्रशासनातील त्रुटीमुळे मतदारांना गैरसोय भासली. काही ठिकाणी बोगस मतदान, तर काही ठिकाणी पैसे वाटल्याचे आरोपही समोर आले.

Swapnil S

भाईंंदर: मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत गुरुवारी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. तरीही शहरातील अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बिघाड, मतदार यादीतील गोंधळ आणि प्रशासनातील त्रुटीमुळे मतदारांना गैरसोय भासली. काही ठिकाणी बोगस मतदान, तर काही ठिकाणी पैसे वाटल्याचे आरोपही समोर आले. सकाळी झोपडपट्टी भागातील मतदार मतदान केंद्रात पोहचण्याआधीच त्यांच्या नावावर मतदान झाल्याचे तक्रारी समोर आल्या.

ज्येष्ठ नागरिकांचे मतदान: भाईंदर पूर्वेच्या अभिनव विद्यामंदिर येथे ७८ वर्षीय मूर्रबीदेवी सिंह व्हीलचेअरवर बसून मतदान करण्यास आल्या. त्यांनी सांगितले की, प्रभागाचा नगरसेवक निवडताना मला मतदानाचा अधिकार आहे, त्यामुळे मी माझा हक्क बजावला.

प्रथम मतदारांचे उत्साह: कांनुगो इस्टेट, मीरा रोड येथील शिफा मुचले आणि इतर नवमतदारांनी आपला मतदानाचा हक्क उत्साहाने बजावला. त्यांनी उमेदवार निवडताना स्वच्छ प्रतिमा, परिसरातील कार्यप्रवृत्ती आणि नशा प्रतिबंधक उपाय यावर भर देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

सावळा गोंधळ: महापालिकेने मतदानाची तयारी असल्याचे सांगितले असले, तरी अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता आणि मतदानाची वेळेवर माहिती उपलब्ध नव्हती. निवडणूक निर्णय अधिकारी व जनसंपर्क विभाग यांचा समन्वय नसल्याचेही दिसून आले.

बोगस मतदान: काशीमीरा प्रभाग क्रमांक १४ मध्ये काही पुरुषांचे मतदान अगोदरच झाल्याचे आढळले. भाईंदर पश्चिमेत देखील एका पुरुषाचे मतदान दुसऱ्याने केले गेले. यामुळे बोगस मतदानाची शंका उपस्थित झाली.

आचारसंहितेचे उल्लंघन: मीरा रोड प्रभाग २० मध्ये भाजप पोलिंग एजंटने उमेदवाराचे नाव लावलेले बॅच लावल्याचे आढळले. मनसेच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास येताच बॅच काढायला लावण्यात आले.

पैसे वाटल्याचे आरोप: मीरा रोड प्रभाग १२ मधील आयडियल पार्क परिसरात मतदारांना पैसे वाटल्याचे निदर्शनास आले, पैसे वाटणाऱ्या व्यक्तीने घटनास्थळ सोडले.

मीरा-भाईंदर मतदानाची टक्केवारी

७.३० ते ९.३० = ६ .९२ %

९.३० ते ११.३० = १६.६९ %

११.३०ते १.३० = २८. १० %

१.३० ते ३.३० = ४० %

Maharashtra Election Results Live : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पवार काका-पुतण्याला धक्का; भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा

मराठीविरोधात गरळ ओकणाऱ्या भाजप खासदाराने ठाकरे बंधूंना डिवचले; BMC निकाल बघून म्हणाले, "मी मुंबईत येऊन उद्धव-राज...

ठाकरे बंधूंना धक्का? BMC सह राज्यातील बहुतांश महापालिका होणार 'भाजपमय'; विविध 'एक्झिट पोल'मधील अंदाज

Thane : अनेक मतदान केंद्रांवर EVM बिघाड; मशीन बंद, सिरीयल क्रम चुकले; मतदारांना मनस्ताप

पुणे - पिंपरीमध्ये मतदानात मोठा गोंधळ!मतदारयादीतील नावे गायब, ईव्हीएम बिघाड, बोगस मतदानाचे आरोप