मीरारोडमध्ये चार कोटींच्या सोन्यावर नोकराचा डल्ला; राजस्थानातून दोघांना अटक प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

मीरारोडमध्ये चार कोटींच्या सोन्यावर नोकराचा डल्ला; राजस्थानातून दोघांना अटक

मीरारोड पूर्वेतील ज्वेलर्सच्या दुकानातून ४ किलो ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. अंदाजे चार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या या चोरीप्रकरणी मीरा-भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखेने राजस्थानातील जयपूर येथून दोघांना अटक केली.

Mayuri Gawade

भाईंदर : मीरारोड पूर्वेतील ज्वेलर्सच्या दुकानातून ४ किलो ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. अंदाजे चार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या या चोरीप्रकरणी मीरा-भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखेने राजस्थानातील जयपूर येथून दोघांना अटक केली. दिनेश रावत (३५) आणि त्याला मदत करणारा ललित सिंह अशी आरोपींची नावे आहेत.

मीरारोड पूर्वेतील क्विन्स पार्क परिसरातील 'शगुन गोल्ड' दुकानात १९ ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास चोरी झाली होती. दुकानमालक राजेश बापना यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

हार, मंगळसूत्र, अंगठ्या, चेन, ब्रेसलेट आदी सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. चोरीनंतर दुकानात काम करणारा दिनेश रावत फरार झाल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढत जयपूर गाठले आणि दोघांना अटक केली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

टॅक्सी, रिक्षाचालकांची याचिका निकाली; मराठी शिकण्यासाठी सरकारने वर्षभराची मुदत दिल्याचे न्यायालयाचे मत

Mumbai : स्थानकांवर थुंकल्यास हजार रुपये दंड; न भरल्यास प्रवाशाला न्यायालयात उभे करणार

मुद्रांक कायद्यातील मुदतीबाबत तिढा; प्रकरण मुख्य न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे वर्ग

'समृद्धी' महामार्गावर दरोडा! गाडी थांबवून वकिलाला लुटले; कुटुंबाला मारहाण करत १८ लाखांचे सोन्याचे दागिने, रोकड पळवली

यंदाची यूएस ओपन जिंकणार कोण? हंगामातील अखेरची ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा आजपासून