बकरी ईदनंतर मीरारोडमध्ये नवरात्रोत्सवावरून नवा वाद! गरबा-दांडियासाठी १२० कुटुंबीयांना हवी परवानगी प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

बकरी ईदनंतर मीरारोडमध्ये नवरात्रोत्सवावरून नवा वाद! गरबा-दांडियासाठी १२० कुटुंबीयांना हवी परवानगी

मीरा रोड पूर्वेकडील पूनम इस्टेट क्लस्टर-१ सहकारी गृहनिर्माण संस्थेत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादानंतर आता नवरात्रोत्सवाच्या आयोजनावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

Swapnil S

भाईंंदर : मीरा रोड पूर्वेकडील पूनम इस्टेट क्लस्टर-१ सहकारी गृहनिर्माण संस्थेत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादानंतर आता नवरात्रोत्सवाच्या आयोजनावरून नवा वाद निर्माण झाला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त सामायिक जागेत गरबा, दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सुमारे १२० कुटुंबीयांनी सोसायटीकडे परवानगी मागितली होती. मात्र, सोसायटी प्रशासनाने परवानगी नाकारल्याने रहिवाशांनी आक्षेप घेत सहकारी संस्था विभागाकडे तक्रार केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून मात्र नियमानुसार परवानगी दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी १८ जून रोजी यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. त्यावर ठाणे तालुका उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाने २५ जून रोजी कायदा व मंजूर उपविधींनुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश सोसायटीला दिले होते. मात्र, त्यानंतरही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

दरम्यान, सोसायटी कोणत्याही धर्माच्या सणाला विरोध करत नसून, सर्वसाधारण सभेतील ठरावाची अंमलबजावणी केली जात असल्याचे पदाधिकारी रूपा पिंटो, दानिश शेख व मिनाज शेख यांनी स्पष्ट केले.

रहिवाशांचा आक्षेप

पूनम इस्टेट क्लस्टर-१ मध्ये सुमारे ६२५ सदनिका असून, विविध धर्मांचे नागरिक येथे वास्तव्यास आहेत. ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सवासाठी सामायिक जागेत कार्यक्रम घेण्याची मागणी रहिवाशांनी केली होती. कार्यक्रमादरम्यान सोसायटीचे नियम, शासनाच्या सूचना, सुरक्षितता व स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. या निर्णयाला उमाशंकर नाग यांच्यासह इतर रहिवाशांनी आक्षेप घेतला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या सुरक्षेत वाढ; 'झेड प्लस' सुरक्षा अजून मजबूत

Mumbai : विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल उद्यापासून सेवेत; ध्वनिरोधक बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात

Mumbai : भगत ताराचंदसह चौघांचे परवाने रद्द; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Mumbai : वरळीची हवा सर्वात खराब; एक्यूआय १६४ वर, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची आकडेवारी