मुंबई

५० ते ६० जणांकडून घेतलेल्या साडेसहा कोटींचा अपहार

कंपनीत ३६ लाख ५५ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती

नवशक्ती Web Desk

मुंबई : कंपनीच्या विविध योजनेत गुंतवणूक केल्यास तिप्पट रक्कमेचे गाजर दाखवून ६० हून अधिक गुंतवणुकदारांची सुमारे साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या संचालकाविरुद्ध साकिनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात रितेश पांचाळ, संदीप मांजरेकर, सुनिल मुळे यांच्यासह श्री महाकाली ग्रुप ऑफ कंपनी, श्री महाकाली सहकारी क्रेडिट सोसायटीचे इतर संचालकाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. ५१ वर्षांची तक्रारदार महिला साकिनाका येथे राहत असून, ती पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांसाठी खाजगी कोचिंग क्लासेस घेते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यांत ती तिच्या माहेरी गेली होती. यावेळी तिच्या वडिलांच्या घरी श्री महाकाली कंपनीचे सेवाराम जैस्वानी आणि मोहन पाटील हे दोन कर्मचारी त्यांच्या कंपनीची विविध योजनांची माहिती देण्यासाठी आले होते. या दोघांनी पवई येथील रितेश पांचाळ यांच्या मालकीचे तेरा कंपन्या असून, या कंपनीने त्यांच्या गुंतवणुकदारासाठी विविध आकर्षक व्याजदराच्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनेत गुंतवणूक केल्यास त्यांना दहा ते वीस टक्के महिन्याला तिप्पट परतावा मिळेल. त्यामुळे या महिलेने तिच्या बहिणीसह वडिलांसोबत कंपनीच्या ठाणे, पवईतील कार्यालयात भेट दिली होती. तिथेच त्यांची रितेश पांचाळ, संदीप मांजरेकर, सुनिल मुळेसह इतर संचालकाची भेट झाली होती. या भेटीनंतर त्यांनी कंपनीत ३६ लाख ५५ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत