१२५ लाख टन भार पेलण्याची क्षमता; पुलाचे आयुर्मान १०० वर्षांचे  
मुंबई

Missing Link Project : १२५ लाख टन भार पेलण्याची क्षमता; पुलाचे आयुर्मान १०० वर्षांचे

‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे उद‌्घाटन १ मे रोजी होणार आहे. या प्रकल्पात पश्चिम घाटातील दोन डोंगरामध्ये केबल स्टेड पूल उभारणीचे आव्हान मोठे होते.

Swapnil S

मुंबई : ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे उद‌्घाटन १ मे रोजी होणार आहे. या प्रकल्पात पश्चिम घाटातील दोन डोंगरामध्ये केबल स्टेड पूल उभारणीचे आव्हान मोठे होते. गुंतागुंतीचे अभियांत्रिकी, दळणवळणाच्या अडचणी, आणि जागतिक सहकार्याने जवळपास सहा वर्षांनंतर हा पूल पूर्ण झाला आहे.

या पूलाच्या उभारणीबाबत ॲफकॉन्सचे प्रकल्प संचालक रंजन कुमार मिश्रा यांच्याशी ‘एफपीजे-नवशक्ति’च्या विशेष प्रतिनिधी स्वीटी भागवत यांच्याशी केलेली बातचीत.

ॲॅकफॉन्सचे प्रकल्प संचालक मिश्रा म्हणाले की, हा पूल पश्चिम घाटातील दोन टेकड्यांमध्ये उभा आहे. ज्यामुळे बांधकामादरम्यान जागेवर पोहोचणे ही मोठी अडचण होती. हा पूल ताशी १०० किमी वेगाने जाणाऱ्या वाहनासाठी बनवला असून त्याचे आयुर्मान १०० वर्षांचे आहे, असे ते म्हणाले.

मिश्रा म्हणाले की, या मार्गाच्या रचनेमुळे हे एक गुंतागुंतीचे काम होते. उपकरणे, साहित्य आणि मनुष्यबळ पोहोचवण्यासाठी अतिरिक्त प्रवेश मार्ग विकसित करावा लागला.आम्हाला संपूर्ण पायाभूत सुविधा शून्यातून उभाराव्या लागल्या. यंत्रसामग्रीची वाहतूक करणे, कामगारांच्या निवासस्थानांची उभारणी करावी लागली, असे त्यांनी सांगितले.

रणगाडे, ट्रेलरसाठी सक्षम

‘आयआरसी क्लास ७०आर’ लोडिंगनुसार या पुलाची रचना सर्वोच्च भार मानकांनुसार करण्यात आली आहे. हा केवळ नियमित वाहतुकीसाठी असलेला पारंपरिक पूल नाही. तो लष्करी रणगाडे आणि विशेष औद्योगिक ट्रेलरसह अत्यंत जड भार हाताळू शकतो.

'फ्लायदुबई'च्या विमानात थरार; मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत, जखमी होऊनही वाचवला १७४ प्रवाशांचा जीव

कचरा टाकाल तर दंड भराल! मुंबईत २८ दिवसांत १,३३६ जणांवर कारवाई; १८ लाख ७० हजारांचा दंड वसूल

CNG Price Hike : मुंबईकरांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! CNG महागला; आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे

२५ सेकंदात घराबाहेरून विद्यार्थिनीला उचललं? अपहरण प्रकरणाला आता वेगळंच वळण; तरुणीने स्वतःच व्हिडिओद्वारे केला खुलासा

Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट