मुंबई

Mumbai : मिठीतील गाळ उपशाला वेग! ४ एप्रिलपासून वेगाने होणार काम; ९ लाख मेट्रिक टन गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट

मिठी नदीतील गाळ उपसा करण्यासाठी दोन कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळाला असून शुक्रवारी ‘सी पॅकेट’ उघडणार आहे. त्यानंतर रविवारपासून मिठी नदीतील गाळ उपसा करण्यास सुरुवात होईल. पोकलेन मशीन आदी साहित्य उपलब्ध झाल्यावर ४ एप्रिलपासून गाळ उपसा करण्यास वेग येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

Swapnil S

मुंबई : मिठी नदीतील गाळ उपसा करण्यासाठी दोन कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळाला असून शुक्रवारी ‘सी पॅकेट’ उघडणार आहे. त्यानंतर रविवारपासून मिठी नदीतील गाळ उपसा करण्यास सुरुवात होईल. पोकलेन मशीन आदी साहित्य उपलब्ध झाल्यावर ४ एप्रिलपासून गाळ उपसा करण्यास वेग येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

१८ मार्च रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेसचे गटनेते अश्रफ आजमी यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत मिठी नदीची सफाई झाली नाही तर मुंबई जलमय होईल, असा आरोप केला होता. आजमी यांच्या हरकतीच्या मुद्द्यावर अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्थायी समितीत मिठी नदीच्या सफाईचे सादरीकरण केले. मुंबई महापालिकेच्या २४ पैकी २० वॉर्डात नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. फक्त मिठी नदीतील गाळ उपसा करण्यासाठी निविदा प्रक्रियेस कंत्राटदाराचा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र आता दोन कंत्राटदार आले असून दोन दिवसांत सगळी प्रक्रिया अंतिम करून रविवारपासून गाळ उपसा करण्यास सुरुवात होईल. परंतु ४ एप्रिलपासून मिठी नदीतील गाळ उपसा करण्याच्या कामास वेग येईल. यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वी ९ लाख ६० हजार ७१३ मेट्रिक टन गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट असून ८,७५० मेट्रिक टन गाळ उपसा करण्यात आला आहे.

गाळ उपसा करताना एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला असून डम्पिंग ग्राऊंडवर गाळ अपलोड करताना व्हिडिओ नसल्यास संबंधित कंत्राटदाराची देयके रोखण्यात येतील. एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्याने गेल्या वर्षी कंत्राटदारास १२ ते १५ कोटींचा दंड आकारला होता. त्यामुळे एआय तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचे अभिजीत बांगर यांनी यावेळी सांगितले.

मायनर नाल्यातील गाळ उपसाचे काम सुरू असून प्रत्येक फेरीचा डेटा आला तर पेमेंट दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गाळ उपसा करण्यावर नजर ठेवली जात असून दोन ते तीन दिवसांत वॉररूम कार्यान्वित होईल, असेही ते म्हणाले.

असे होतेय काम

  • मुख्य नाले

शहरात - २.७४

पूर्व उपनगर - ४०४

पश्चिम उपनगर - ०.६३ टक्के

देवनार कांजूर डंम्पिग ग्राऊंडवर गाळ टाकणार

मिठी नदीसह अन्य नाल्यातील उपसा केलेला गाळ टाकण्यासाठी देवनार व कांजूर डंम्पिग ग्राउंडचा पर्याय शोधला जात आहे. दरम्यान, स्थायी समितीत बुधवारी मिठी नदीवर १ तास ७ मिनिटे चर्चा झाली.

...तर दंडात्मक कारवाई होणार -किल्लेदार

गाळ वाहून नेण्यासाठी डम्पर वापरले जातात. परंतु डम्परच्या नंबर प्लेटवर माती असते मग ते डम्पर कसे ट्रॅक करणार, असा प्रश्न मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी केला. गाळ वाहून नेणाऱ्या डम्परच्या नंबर प्लेटवर मुद्दाम माती लावली असेल तर दंडात्मक कारवाई होणार, असेही ते म्हणाले.

Maharashtra HSC Result 2026 : आज बारावीचा निकाल लागणार; ऑनलाईन चेक करा एका क्लिकवर, जाणून घ्या महत्त्वाची माहिती

जनगणना दोन टप्प्यात! नागरिकांनी डिजिटल पद्धतीने स्व-गणना करावी; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘जनगणना-२०२७’चा शुभारंभ

Mumbai : ‘नीट’ परीक्षेमुळे मध्य रेल्वेचा रविवारचा ब्लॉक रद्द; शनिवारी मेगाब्लॉक, रात्री ११.१६ वाजता CSMTहून शेवटची लोकल

Pune : सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या ४ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार; हत्या करुन शेणाच्या ढिगाऱ्यात लपवला मृतदेह

Mumbai : पालिकेचे ३ कर्मचारी गंभीर जखमी; पवईत गटार साफ करताना अंगावरून टेम्पो गेल्याची धक्कादायक घटना