मुंबई

नितीश कुमारांच्या JDU ला सोडचिठ्ठी; कपिल पाटील यांच्या नवीन पक्षाची घोषणा

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई

जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव आणि विधानपरिषदेचे आमदार कपिल पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, समाजवादी गणराज्य पार्टी नावाच्या नवीन पक्षाची त्यांनी घोषणा केली आहे.

जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने कपिल पाटील यांनी त्यांच्यापासून फारकत घेतली आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत धारावी येथे आयोजित सभेत कपिल पाटील यांनी नवीन पक्षाची घोषणा केली. कपिल पाटील हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच पुढची राजकीय वाटचाल करणार आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नितीश कुमार यांनी भाजपची साथ धरल्याने कपिल पाटील अस्वस्थ होते. नितीश कुमार यांची एनडीएसोबत जाण्याची भूमिका त्यांना पटली नव्हती. कपिल पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत सभा, मेळाव्यांमध्ये दिसायचे. समाजवादी, कम्युनिस्ट आदी पक्षांची मोट बांधून महाविकास आघाडीत आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. अशातच नितीश कुमारांनी अचानक यूटर्न घेतल्याने कपिल पाटील यांची अडचण झाली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी जनता दल युनायटेड पक्षाचा राजीनामा दिला आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त