मुंबई

आमदार सदा सरवणकर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

राज्यात शिवसेनेतील मोठी फूट त्यानंतर सत्तांतर असे हायव्होल्टेज नाटय घडत होते

प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे शस्त्रक्रियेनंतर आता सक्रिय झाले आहेत. त्यांनी भेटीगाठींना सुरूवात केली आहे. शिंदेगटाचे आमदार सदा सरवणकर यांनी बुधवारी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सध्याच्या राजकीय घडामोडींवर दोघांत चर्चा झाल्याचेही समजते.राज्यात शिवसेनेतील मोठी फूट त्यानंतर  सत्तांतर असे हायव्होल्टेज नाटय घडत होते. मात्र त्याचवेळी राज ठाकरे हे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने या सर्व नाट्यापासून अलिप्तच होते. एरवी राज्यातील राजकीय घडामोडींवर राज यांची नेहमी तिखट तर कधी व्यंगात्मक, नर्मविनोदी प्रतिक्रिया हमखास असतेच. मात्र त्यांनी या संपूर्ण घडामोडींत दोन चार वेळाच प्रतिक्रिया दिल्या. आता ते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मनसेचे विधानसभेतील आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी विधानसभाध्यक्ष निवड असो वा शिंदे-फडणवीस सरकारवरील विश्वासदर्शक प्रस्ताव असो त्यांनी  भाजपाच्या बाजूनेच मतदान केले आहे. आगामी महापालिका निवडणुकांत देखील याचे पडसाद उमटणार आहेत. दरम्यान,राज ठाकरे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले होते.एकनाथ शिंदेजी आपण मुख्यमंत्री झालात.नशिबाने आपल्याला ही संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तुत्वाने सिद्ध कराल ही आशा. आपण बेसावध राहू नका सावधपणे पावले टाका असे राज यांनी पत्रात म्हटले होते.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश