मुंबई

एमएमआरसी बायो-मिथेनेशन प्लांट उभारणार; ग्रँट रोड येथील एलटी मार्केट विद्युत रोषणाईने उजळणार

स्वच्छ ऊर्जेचे उत्पादन अधिक सुलभ करण्यासह पालिकेच्या सेंद्रिय ओल्या कचऱ्याचे पर्यावरणदृष्ट्या योग्य व्यवस्थापन करण्यात येणार

Swapnil S

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ.) ने कॉर्पोरेट एन्व्हायर्नमेंट रिस्पॉन्सिबिलिटी कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या सेंद्रिय ओल्या कचऱ्यापासून वीज निर्माण करणारा १.५ टीडीपी क्षमतेचा बायो-मिथेनेशन प्लांट उभारणार आहे. काळबादेवी-गिरगाव (के ३ इमारत) येथील इमारतींसाठी पुनर्विकास प्रकल्पाला देण्यात आलेल्या पर्यावरण मंजुरीचे अनुपालन म्हणून मुं.मे.रे.कॉ.ने बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) च्या सहकार्याने हा पुढाकार घेतला आहे. सेंद्रिय ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांतर्गत उत्पादित होणारा बायोगॅस ग्रँट रोड येथील एलटी मार्केटमध्ये विद्युत रोषणाई करण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे.

स्वच्छ ऊर्जेचे उत्पादन अधिक सुलभ करण्यासह पालिकेच्या सेंद्रिय ओल्या कचऱ्याचे पर्यावरणदृष्ट्या योग्य व्यवस्थापन करण्यात येणार आहे. कचऱ्याच्या वाहतुकीचा खर्च कमी करण्यासह हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हा एक फायदेशीर उपाय ठरणार आहे. मुं.मे.रे.कॉ. नेहमीच शहरातील पर्यावरण संतुलित ठेवण्याकरिता सकारात्मक योगदान देण्यासाठी वचनबद्ध असून भविष्यातही त्या दृष्टीने कार्य करत राहील, असे मुं.मे.रे.कॉ.चे संचालक (नियोजन आणि रिअल-इस्टेट) आर. रमणा यांनी सांगितले. एरोकेअर एव्हिएशन सर्व्हिसेस प्रा. लि. या एजन्सीला इन्स्टॉलेशन, संचलन आणि देखभालीचे काम दिले आहे.

ठाकरे बंधूंची भाऊबीजही खास! बहिणीने बऱ्याच वर्षांनी एकत्र ओवाळलं

लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट! ‘ई-केवायसी’ला तात्पुरती स्थगिती

सलीम डोला ड्रग्ज प्रकरण : हँडलर मोहम्मद सलीम शेख दुबईतून हद्दपार; मुंबई पोलिसांनी केली अटक

दिवाळी साजरी करायला गेलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; नॅशनल पार्कमध्ये भरधाव बाईकने दीड वर्षांच्या चिमुरडीला उडवले, जागीच मृत्यू

Mumbai : सोसायटीमध्ये खेळत असलेल्या ७ वर्षाच्या मुलाला कारने चिरडले, महिला चालकाविरोधात गुन्हा दाखल, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल