(संग्रहित छायाचित्र)
मुंबई

मुंबई मेट्रोसाठी ५७ ट्रेनची खरेदी; एलअँडटी आणि एनसीसी कंपन्यांनी तयार केले डबे

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो-४, मेट्रो-४ अ आणि मेट्रो-६ या मार्गाकरिता तब्बल ५७ मेट्रो ट्रेन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. एलअँडटी आणि एनसीसी या कंपन्यांना याबाबतचे कंत्राट देण्यात आले असून या दोन्ही कंपन्या प्रथमच मेट्रो ट्रेनची निर्मिती करणार आहेत.

Swapnil S

मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो-४, मेट्रो-४ अ आणि मेट्रो-६ या मार्गाकरिता तब्बल ५७ मेट्रो ट्रेन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. एलअँडटी आणि एनसीसी या कंपन्यांना याबाबतचे कंत्राट देण्यात आले असून या दोन्ही कंपन्या प्रथमच मेट्रो ट्रेनची निर्मिती करणार आहेत.

'वडाळा-ठाणे-कासारवडवली-गायमुख' या मेट्रो-४ तसेच 'स्वामी तर समर्थ नगर ते विक्रोळी' या मेट्रो-६ आणि 'मेट्रो ४ अ' या मार्गासाठी - ट्रेन खरेदी करण्याचा निर्णय मंजूर मी झाला आहे. मेट्रो-४ आणि मेट्रो-४ अ या दोन मार्गासाठी एकूण ३९ ट्रेन खरेदी करण्यात येणार असून त्याची निर्मिती एलअँडटी कंपनी करणार आहे. तसेच मेट्रो-६ साठी १८ ट्रेन एनसीसी कंपनी तयार करणार आहे. एमएमआरडीएकडून या मेट्रो मार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. 'मेट्रो ४' आणि 'मेट्रो-४ अ' हे दोन्ही मार्ग २०२५ अखेरीस लोकांच्या सेवेत आणण्याचा विचार आहे. त्यामुळेच ऑगस्टमध्ये चाचण्या घेण्यासाठी मेट्रो ट्रेन उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कार्यकारी समितीने मेट्रो ट्रेनच्या खरेदीला मान्यता दिली.

निविदेला अंतिम मंजुरी

बॉम्बार्डियर कंपनीचे ३९ ट्रेनचे कंत्राट रद्द करण्यात आल्यानंतर एलअॅडटी कंपनीची ४७८८ कोटी रुपयांची निविदा अंतिम मान्यतेसाठी ठेवण्यात आली होती. आता एलअॅडटी कंपनीला ३९ गाड्यांचे कंत्राट मिळाले आहे. मेट्रो-६ मागांसाठी एनसीसी कंपनीने २२६९ कोटी रुपयांची निविदा भरली होती. त्यालाही अंतिम मंजुरी मिळाली आहे. आता दोन्ही कंपन्या आपापल्या ट्रेनच्या पाच वर्षाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पाहणार आहेत.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video