मुंबई

MNS : कोरोनाकाळात युवासेनेकडून झाला कोटींचा घोटाळा; काय म्हणाले मनसे नेते संदीप देशपांडे?

प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनाकाळातील भ्रष्टाचार उघड करणार असल्याची घोषणा केली होती. आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, "कोरोना काळामध्ये काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारची कंत्राटे देण्यात आली. मालाडमध्ये उभारलेल्या कोरोना सेंटरची कंत्राटे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली होती. कोरोना सेंटरला पुरवठा होत असलेल्या वस्तूंची पुरवठ्यापेक्षा अधिकची बिले काढण्यात आली. प्रभाग अधिकारी यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार झाला आहे. यासंदर्भात पुराव्यासह तक्रार ईडी, ईओडब्लू यांच्याकडे करणार आहे." अशी माहिती त्यांनी दिली.

संदीप देशपांडे म्हणाले की, "वीरप्पन गँगचा घोटाळा मी उघड करणार असे ट्विट काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर त्याखाली युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मला शिवीगाळ केली. यावरूनच युवा सेनेवरचा माझा संशय पक्का झाला. आम्ही तपास केल्यानंतर काही धक्कादायक माहीती माझ्यासमोर आली. कोरोना सेंटरमध्ये जेवण पुरविणे, लाँड्री, सॅनिटायझर पुरवण्यासारखी कंत्राटे युवासेनेचे पदाधिकारी वैभव थोरातच्या कंपन्यांना देण्यात आली. ही कामे देत असताना त्याच्या कंपनीची पार्श्वभूमी तपासली गेली नाही. मग ही कंत्राटे देण्यासाठी कोणती शक्ती काम करत होती? याचा तपास केला पाहीजे." अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

पुढे ते म्हणाले की, "या कंत्राटामध्ये पुरवठ्यापेक्षा जास्तीची बिले काढण्यात आली. म्हणजे १०० वस्तूंऐवजी ३० वस्तूंचा पुरवठा करुन इतर वस्तू फक्त कागदावरच दाखवण्यात आल्या. वैभव थोरात आणि प्रभाग अधिकारी यांच्या संगनमताने हा घोटाळा झाला आहे. थोरात आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या संभाषणाचे स्क्रिनशॉटही माझ्याकडे आहेत." असे म्हणत त्यांनी ते स्क्रिनशॉट माध्यमांना दाखवले. पुढे, "अधिकची बिले लावून त्यातील हिस्सा वेगवेगळ्या लोकांना दिला गेला" असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. यासोबतच ओंकार नलावडे, सुनील नलावडे, चैतन्य बनसोड यांची नावे या घोटाळ्यामध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, " कोरोना काळात या कंपन्यांना ७० ते ७५ कोटींची कामे दिली असावीत. या भ्रष्टाचाराचे पुरावे ईडी, आयटीकडे देणार आहे. तसेच या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत."

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम

थांबा... पुढे धोका, आज समुद्र खवळणार; हवामान विभागाचा 'अलर्ट'; समुद्रात जाणे टाळा, पालिकेचे आवाहन