संग्रहित छायाचित्र पीटीआय
मुंबई

मोदींनी दहशतवाद, नक्षलवाद कायमचा संपवला - शहा

Maharashtra assembly elections 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातून दहशतवाद, नक्षलवाद कायमचा संपुष्टात आणला असून, जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा ‘कलम ३७०’ हटवण्यात आल्याने संपुष्टात आला असून तो पुन्हा लागू करता येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले.

Swapnil S

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातून दहशतवाद, नक्षलवाद कायमचा संपुष्टात आणला असून, जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा ‘कलम ३७०’ हटवण्यात आल्याने संपुष्टात आला असून तो पुन्हा लागू करता येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले.

मुंबईत घाटकोपर, बोरिवली येथे झालेल्या महायुतीच्या प्रचारसभेत शहा बोलत होते. ‘विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. यादिवशी महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत येणार, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. आघाडीचा सुपडा साफ होणार, असा दावाही अमित शहा यांनी केला. काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संविधान संपवणार, अशी ओरड करत आहेत. पण संविधान कोणी संपवू शकत नाही. राहुल गांधी यांनी जनतेशी धोका करीत देशातील जनतेचा अपमान केला आहे, अशी टीका त्यांनी केली.

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेत येत असून नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करायचे आहेत. त्यामुळे विजयाच्या संकल्पाची मूठ घट्ट करा आणि उतर मुंबईतील सहाही उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी उत्तर मुंबईतील मतदारांना केले.

साताऱ्यात नऊ आमदारांची प्रतिष्ठा पणाला; कुणाचा होणार 'करेक्ट कार्यक्रम' याकडे सर्वांच्या नजरा!

ठाण्यात महायुतीतील उमेदवारांचे टेन्शन वाढले?घटक पक्षांतील कार्यकर्त्यांनी प्रचाराला मारली दांडी

आता सत्ताधाऱ्यांची बॅग तपासणी; टीकेनंतर निवडणूक अधिकारी सक्रिय

शरद पवार यांचे छायाचित्र, व्हिडीओ वापरू नका; सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला आदेश

मतदान टक्का वाढीसाठी भव्य ऑफर; मतदारांना खरेदी, खानपान आणि मनोरंजनातही मिळणार सवलत