मुंबई

मुंबईत मधुमेह व रक्तदाब आजारांचे सर्वाधिक रुग्ण

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक आरोग्यसेवेचे सक्षमीकरण करण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करत आहे

प्रतिनिधी

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात मधुमेह व रक्तदाबाचे रुग्ण आढळले आहेत. १८ ते ६९ वयोगटातील लोकांना मधुमेह व रक्तदाबाचा धोका असून मुंबईत ३४ टक्के रुग्ण ब्लडप्रेशर तर १९ टक्के रुग्ण डायबिटीसचे असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आल्याचे सहकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईला मधुमेह व रक्तदाब आजारांचा विळखा बसला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक आरोग्यसेवेचे सक्षमीकरण करण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून विविध पायाभूत बाबींचे नियोजन व अंमलबजावणी करण्यासोबतच सहआयुक्त, उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि संबंधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सक्षमीकरण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे अंधेरी परिसरात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यशाळेदरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यशाळेला परिमंडळीय उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, विभागस्तरीय सहाय्यक आयुक्त, मार्गदर्शक डॉ. रामस्वामी, माजी महासंचालक (आरोग्य सेवा) डॉ. सुभाष साळुंखे, विश फाउंडेशन या संस्थेचे डॉ. राजेश सिंह व इतर प्रतिनिधी, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. अमोल वानखेडे, डिजिटल हेल्थ मिशनचे उप संचालक डॉ. समीर कंवर व इतर प्रतिनिधी, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, सह कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, पाथ या संस्थेचे प्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिकद्वारेदेखील असंसर्गजन्य रोगांचे तपासणी व प्राथमिक उपचार केले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने रक्तदाब व मधुमेह याबाबतची तपासणी करण्यावर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर आरोग्य सेवासुविधांचे लोकसंख्या आधारित विश्लेषण हे विभागस्तरीय पद्धतीने केले जाणार आहे. तसेच आरोग्य स्वयंसेविका आणि आशा सेविका यांच्याद्वारे गृहभेटी देण्यात येऊन रक्तदाबविषयक माहिती गोळा करून असंसर्गजन्य रोग प्रतिबंध (एनसीडी) कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. विभागस्तरावरील आवश्यक त्या सेवासुविधांसह पोर्टा केबिन उभारणी करण्यासाठी संबंधित सहाय्यक आयुक्त आणि अभियंते यांना यापूर्वीच निर्देशित करण्यात आले आहे. तसेच आरोग्यसेवांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिमंडळीय उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांच्या स्तरावर नियमितपणे कार्यक्रमांचे पुनरावलोकन करण्याचेही निर्देश अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी दिले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?