Mumbai : यकृत प्रत्यारोपणात माताच ठरल्या जीवनदात्या; वाडिया रुग्णालयात ७० टक्के प्रकरणात मातांनीच केले यकृताच्या भागाचे दान 
मुंबई

Mumbai : यकृत प्रत्यारोपणात माताच ठरल्या जीवनदात्या; वाडिया रुग्णालयात ७० टक्के प्रकरणात मातांनीच केले यकृताच्या भागाचे दान

मातृत्व हे सहसा बिनशर्त प्रेमाचे शुद्ध रूप मानले जाते, परंतु 'बाई जेरबाई वाडिया - हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेन' मध्ये अनेक मातांनी त्याही पलीकडे जाऊन आपल्या यकृताचा एक भाग दान करून आपल्या मुलांना आयुष्याची दुसरी संधी दिली आहे.

Swapnil S

मुंबई : मातृत्व हे सहसा बिनशर्त प्रेमाचे शुद्ध रूप मानले जाते, परंतु 'बाई जेरबाई वाडिया - हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेन' मध्ये अनेक मातांनी त्याही पलीकडे जाऊन आपल्या यकृताचा एक भाग दान करून आपल्या मुलांना आयुष्याची दुसरी संधी दिली आहे.

'मदर्स डे' (मातृदिन) च्या पाश्र्वभूमीवर, रुग्णालयाने उघड केले की त्यांच्या १६ बाल यकृत प्रत्यारोपणांपैकी जवळपास ७०% शस्त्रक्रिया त्या मातांमुळे शक्य झाल्या आहेत, ज्यांनी जीवघेण्या यकृताच्या आजारांशी झुंजणाऱ्या आपल्या मुलांसाठी जिवंत अवयवदाता बनण्याचा धाडसी निर्णय घेतला. प्रत्येक प्रत्यारोपणामागे त्याग, जिद्द आणि आशेची एक प्रेरणादायी कथा आहे.

अशीच एक कथा मुंबईतील ३४ वर्षीय ज्योती विजय सिंग यांची आहे. त्यांचा सहा वर्षांचा मुलगा प्रियांश सिंग याला 'सेंट्रली लोकेटेड अनरिसेक्टेबल हेपेटोब्लास्टोमा' नावाचा आजार असल्याचे निदान झाले होते. हा लहान मुलांमध्ये आढळणारा यकृताचा एक दुर्मिळ आणि अत्यंत घातक कर्करोग आहे.

सुरुवातीला प्रियांशमध्ये पोट फुगणे, भूक न लागणे, अशक्तपणा, थकवा आणि वजन कमी होणे अशी लक्षणे दिसू लागली होती, ज्याचा परिणाम त्याच्या दैनंदिन जीवनावर आणि शालेय शिक्षणावर होऊ लागला. सखोल तपासणीनंतर डॉक्टरांनी निदानाची पुष्टी केली आणि त्वरित उपचार सुरू केले.

अनेक महिन्यांच्या कालावधीत प्रियांशवर केमोथेरपीच्या अनेक फेऱ्या आणि वारंवार रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली. या सर्व भावनिक आणि शारीरिक कष्टाच्या काळात ज्योती खंबीरपणेत्याच्या पाठीशी उभ्या राहिल्या.

डॉक्टरांनी स्पष्ट केले की, गाठ यकृताच्या मध्यभागी असल्यामुळे सामान्य शस्त्रक्रियेद्वारे ती काढणे शक्य नव्हते, त्यामुळे 'यकृत प्रत्यारोपण' हाच एकमेव खात्रीशीर उपचार उरला होता. कोणताही संकोच न बाळगता ज्योतीने आपल्या यकृताचा डावा भाग- सुमारे २५० ग्रॅम- मुलाला दान करण्याचा निर्णय घेतला. ही अत्यंत गुंतागुंतीची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया जवळपास १२ तास चालली आणि यशस्वीरित्या पार पडली, ज्यामुळे प्रियांशला नवीन जीवन मिळाले.

रुग्णालयाच्या प्रत्यारोपण कार्यक्रमाबद्दल बोलताना डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या, "संपूर्ण भारतात, यकृताच्या शेवटच्या टप्प्यातील आजाराने ग्रस्त मुलांसाठी 'लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट' (जिवंत दात्याकडून यकृत प्रत्यारोपण) हे एक महत्त्वाचे जीवनदान ठरत आहे"

वाडियामधील प्रत्येक यकृत प्रत्यारोपण हे केवळ वैद्यकीय यश नसून ती आशा, त्याग आणि माणुसकीची कथा आहे. ज्या गोष्टीने आम्ही सर्वात जास्त भारावून जातो, ती म्हणजे या मातांनी दाखवलेली असामान्य शक्ती. आपल्या मुलांनी निरोगी आणि समाधानी आयुष्य जगावे यासाठी त्या स्वतः मोठ्या शस्त्रक्रियेला आनंदाने सामोरे जातात.
-डॉ. मिनी बोधनवाला

आजचे राशिभविष्य, १० मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Mother's Day 2026 : "सुखाची गं तू साऊली..."; मातृदिनानिमित्त आईला द्या खास शुभेच्छा

Sunday Special Recipe : कोळी स्टाईल झणझणीत अंड्याचं भरीत; एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल

Fitness Tips : व्यायामासाठी वेळ मिळत नाही? बसल्या जागी करा 'हे' ५ सोपे व्यायाम, शरीर राहील अ‍ॅक्टिव्ह

Cooking Tips : डाळ झटपट शिजवण्यासाठी लक्षात ठेवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी