मुंबई

मोटरमेनचे आंदोलन मागे; डीआरएमसोबत झालेल्या बैठकीनंतर निर्णय

मोटरमन मुरलीधर शर्मा यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मोटरमेनमध्ये संतापाची लाट पसरली होती.

Swapnil S

कमल मिश्रा/मुंबई : विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर मोटरमेननी ‘नियमानुसार काम’ आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मोटरमन मुरलीधर शर्मा यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मोटरमेनमध्ये संतापाची लाट पसरली होती. परिणामी मोटरमेननी अतिरिक्त कामास नकार देऊन ‘नियमा’नुसार काम सुरू केले. त्यामुळे मुंबईची लोकल विलंबाने धावू लागली. रेल्वेचे डीआरएम रजनीश गोयल व मोटरमन यांच्यात रविवारी तातडीची बैठक झाली. यात सीआरएमएसचे विभागीय अध्यक्ष विवेक शिशोदिया व मोटरमन सहभागी झाले होते. सिग्नल तोडल्यानंतर मोटरमनला सक्तीची निवृत्ती देण्याचा निर्णय स्वीकारार्ह नाही, अशी भूमिका कामगार संघटनांनी घेतली. शिशोदिया यांनी मोटरमनची बाजू डीआरएमसमोर मांडली. या बैठकीत डीआरएम रजनीश गोयल यांनी मोटरमनच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. कामगार नेते विवेक शिशोदिया म्हणाले की, सिग्नल तोडल्यानंतर होणाऱ्या शिक्षेबाबतच्या नियमात बदल करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डासमोर रेल्वेच्या मुंबई विभागाकडून मांडला जाईल, असे आश्वासन डीआरएम रजनीश गोयल यांनी दिले. रेल्वे बोर्डाकडून याबाबतचा अंतिम निर्णय येईपर्यंत मोटरमनना नोकरी हमी मिळू शकेल. सिग्नल तोडल्यानंतर त्यांना तत्काळ कामावरून काढले जाणार नाही. या ठरावामुळे मोटरमन आणि प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सोमवारपासून उपनगरीय गाड्यांचे नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले