मुंबई : महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच दैनंदिन कामकाजातील ताणतणावातून काही काळ विरंगुळा मिळावा आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये सांघिक भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने महावितरणतर्फे दरवर्षी नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या कोकण प्रादेशिक विभागस्तरीय आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे यजमानपद भांडुप नागरी परिमंडलाला मिळाले असून ‘ऊर्जारंग २०२६’ या दोन दिवसीय नाट्यस्पर्धेचा दिमाखदार सोहळा मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत सांघिक कार्यालयाच्या ‘ओल्या भिंती’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली, तर कल्याण परिमंडलाच्या ‘खानदानी’ या नाटकाने द्वितीय क्रमांक मिळवला.
नाट्यस्पर्धेचे उद्घाटन महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी नाट्यस्पर्धेचे अध्यक्ष व कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, कार्यकारी संचालक चंद्रमणी मिश्रा, भांडूप नागरी परिमंडळाचे मुख्य अभियंता संजय पाटील, मुख्य अभियंता साळुंके, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) राजेंद्र पांडे, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड, अधीक्षक अभियंते धनराज बिक्कड, लक्ष्मण काकडे, मंदार अत्रे, माणिकलाल राठोड, देवेंद्र उंबरकर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी, युनियनचे पदाधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. नाट्यप्रयोगांचे परीक्षक म्हणून कला क्षेत्रातील दिग्गज अशोक हंडोरे, प्रेमानंद गज्वी व अंजली वळसंगकर होते.
‘ओल्या भिंती’ या कहाणीत मुलीला जन्म दिल्यानंतर तिला आणि तिच्या आईला एकटे सोडून गेलेल्या वडिलांमुळे आई-मुलीच्या आयुष्यात पोकळी निर्माण होते. परिस्थितीशी लढत आई मुलीला वाढवते; मात्र मनातील प्रेमाची ओढ, सोबतीची गरज आणि भावनिक आधाराची इच्छा ती दडवून ठेवते. यात आईची घुसमट, मुलीवरील प्रेम, मैत्रिणीची समजूतदार भूमिका व आयुष्यात नव्याने येऊ पाहणाऱ्या व्यक्तीबद्दल आहे.
विशेष पुरस्कार
लेखक- दिपेश सावंत ‘ओये लेले’उतेज्नार्थ : १) ‘ओये लेले’- चंद्रमणी मेश्राम (भूमिका-पुंडलीक इनामदार) २) ‘एक्सपायरी डेट’- अंकिता भालेराव (भूमिका- म्हातारी) ३) ‘खानदानी’- दिपाली लोखंडे (भूमिका-म्हातारी) ४) ‘ओल्या भिंती’- संगीता चव्हाण (भूमिका- मेघा). बाल कलाकार –‘ एक्सपायरी डेट’- रेयांश वाणी (भूमिका- बालपणीचा अजय) ‘ऊर्जारंग २०२६’ या दोन दिवसीय नाट्यस्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी भांडुप नागरी परिमंडलातील अधिकारी, कर्मचारी तसेच आयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले.
नाट्य स्पर्धेतील पुरस्कार
उत्कृष्ट दिग्दर्शन- प्रथम- ‘ओल्या भिंती’- अमित दळवी; द्वितीय: ‘खानदानी’- विजय फुंदेउत्कृष्ट अभिनय- पुरुष प्रथम- दीपेश सावंत यांना ‘ओये लेले’ या भांडुप परिमंडलातील नाटकात केशव लेलेची उत्कृष्ट भूमिकेसाठी; पुरुष द्वितीय: विजय फुंदे यांना नाशिक परिमंडलातील ‘एक्सपायरी डेट’ या नाटकात ‘नाना’ यांची उत्कृष्ट भूमिका निभावल्या बद्दल. उत्कृष्ट अभिनय: स्त्री प्रथम : सांघिक कार्यालयाच्या ओल्या भिंती नाटकात मुख्य भूमिकेत असलेल्या सौ. प्रणाली निमजे स्त्री द्वितीय- कल्याण परिमंडलाच्या ‘खानदानी’ या नाटकात अक्का यांची दमदार भूमिका निभावल्या बद्दल सौ.प्रांजल तेलवणे यांना मिळालानेपथ्य- प्रथम- ‘ओल्या भिंती’-प्रांजल पवार; द्वितीय: ‘खानदानी’- रवींद्र आव्हाड प्रकाशयोजना- प्रथम- ‘ओये लेले’ -सुहास संकपाळ; द्वितीय: ‘ओल्या भिंती’ – अमोल जाधव संगीत- प्रथम- ‘ओल्या भिंती’ –गणेश हटवटे; द्वितीय: ‘ओये लेले’- देवेंद्र गीलुरकर रंगभूषा, वेशभूषा- प्रथम- ‘एक्सपायरी डेट’ -भूषण सोनावणे/निलेश ठाकूर; द्वितीय: ‘ओये लेले’ – नमिता गझदर व श्रीनिवास चटलावार