मुंबई : मुलुंड बस डेपोशी संबंधित भाडेतत्त्वावरील अपघातप्रकरणी बसचालकाविरुद्ध आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या प्रकरणात शनिवारी, ८ ऑगस्टला मुलुंड पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या अपघाताच्या मातेश्वरी बसचे बस निरीक्षक कोकणे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. अपघातानंतर बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चालक आणि संबंधित बस अद्याप पोलिसांच्या ताब्यातच आहेत. या प्रकरणात विरोधी पक्षाकडून चालकाविरुद्ध आक्षेप नोंदवल्यानंतर चालकाची मद्यप्राशनाची तपासणी करण्यात आली. अगरवाल रुग्णालयात ही वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
चालकावर पुढील कारवाई सुरू
पीएसआय किशोर पानसरे यांनी चालक तसेच अपघातग्रस्त बस ९ ऑगस्टला सकाळी ९ वाजेपर्यंत पोलिसांच्या ताब्यात ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.