मुंबई

Mumbai : गर्दीचा फायदा घेत दादर स्टेशनवर मुलीचा विनयभंग; ३० वर्षीय आरोपीला अटक

संध्याकाळी ७ च्या सुमारास, गर्दीच्या वेळी पीडित मुलगी दादर स्थानकाच्या ओव्हरब्रिजवरून जात असताना ही घटना घडली

Swapnil S

मंबई : दादर रेल्वे स्थानकावर १९ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सोमवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास, गर्दीच्या वेळी पीडित मुलगी दादर स्थानकाच्या ओव्हरब्रिजवरून जात असताना ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले.

आरोपीने गर्दीचा फायदा घेत पीडित मुलीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला. त्यामुळे घाबरून जाऊन तिने आरडाओरडा केला. त्यावेळी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुलीने व तिथे ड्युटीवर असलेल्या पोलिसाने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.

"पुलावर मोठा पोलिस बंदोबस्त होता. मुलीने आरडाओरडा करताच पोलिस सतर्क झाले. त्यानंतर मुलीने तसेच पोलिसाने आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

३० वर्षीय आरोपीचे नाव नागेश कहला असे आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील गोरखपूरचा रहिवासी आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता