Mumbai : अगरवाल रुग्णालयाच्या निवासी पुनर्विकासाला गती; केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी, ३८ मजली दोन, तर २२ मजली इमारत  
मुंबई

Mumbai : अगरवाल रुग्णालयाच्या निवासी पुनर्विकासाला गती; केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी, ३८ मजली दोन, तर २२ मजली इमारत

मुलुंड येथील एमटी अगरवाल रुग्णालयाच्या स्टाफ क्वार्टरच्या पुनर्विकासाला गती मिळाली आहे.

Swapnil S

मुंबई : मुलुंड येथील एमटी अगरवाल रुग्णालयाच्या स्टाफ क्वार्टरच्या पुनर्विकासाला गती मिळाली आहे. ३८ मजली दोन तर २२ मजली एक इमारत असून वन बीएचके, टू बीएचके व चार बीएचके फ्लॅट पार्किंगच्या सुविधेसह उपलब्ध होणार आहेत. यासाठी २२२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळाल्याने ऑक्टोबर २०२७ पर्यंत डॉक्टर, रजिस्टार निवासी इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या आरोग्य पायाभूत सुविधा बळकटीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुलुंड (पश्चिम) येथील एम.टी. अगरवाल रुग्णालयासाठी अत्याधुनिक स्टाफ क्वार्टर्स उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. डॉक्टर, निवासी वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक निवास इमारती उभारण्यात येत आहे.

मुलुंड येथील सीटीएस क्रमांक १०२९ व १०३० या भूखंडावर सुमारे ३३४०.२ चौरस मीटर जागेत हा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पात ए, बी व सी अशा तीन विंग असणार आहेत. इमारतींत बेसमेंट, ग्राउंड, चार पोडियम असणार आहे.

रुग्णालयात निवासस्थाने

या प्रकल्पामुळे रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कार्यस्थळाजवळच निवासस्थाने उपलब्ध होणार असून, आपत्कालीन सेवांमध्ये तत्परता वाढणार आहे. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांना पूरक अशा निवासी प्रकल्पामुळे रुग्णसेवेची गुणवत्ता उंचावण्यास मदत होणार आहे.

असे होतेय बांधकाम

  • विंग ए: ३८ मजली इमारत, १२८ (१ बीएचके) फ्लॅट्स

  • विंग बी: २२ मजली इमारत, ५६ (२ बीएचके) फ्लॅट्स आणि १ (४ बीएचके) फ्लॅट

  • विंग सी : ३८ मजली इमारत, १९० वैद्यकीय अधिकारी रूम्स (सिंगल व ट्विन शेअरिंग)

  • एकूण ३७४ निवासी घरे उपलब्ध होणार आहेत.

  • सामायिक पोडियम, १० लिफ्ट्स आणि ७८ पार्किंग सुविधा

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार