मुंबई

मुंबईतील एअर क्वालिटी सेन्सर्स बंद; बांधकाम परिसरात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य कारभार

मुंबईतील वायू प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस खराब होत असताना, शहरातील बांधकाम परिसरात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य कारभार होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस खराब होत असताना, शहरातील बांधकाम परिसरात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य कारभार होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पथकाने केलेल्या तपासणीत १००० हून अधिक बांधकाम प्रकल्पांवर वायू प्रदूषण मोजणारे सेन्सर्स पूर्णपणे बंद असल्याचे उघड झाले असल्याचा आरोप मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवीराजा यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेच्या नियमांनुसार ज्या परिसरात बांधकाम सुरू आहे, त्याठिकाणी AQI मॉनिटरिंग सेन्सर्स कार्यरत असणे बंधनकारक आहे. मात्र अनेक बांधकाम ठिकाणी हे सेन्सर्स बसवण्यात आलेले नाहीत किंवा ज्या ठिकाणी आहे ते बंद आहेत.

या दरम्यान नियम मोडनाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर थेट दंडात्मक कारवाई करण्याऐवजी महापालिकेकडून केवळ इशारे देण्यात येत असल्याचा आरोप रविराजा यांनी केला आहे. तसेच प्रदूषणामुळे मुंबईची हवा 'अत्यंत खराब' श्रेणीत पोहोचत असताना, पालिका कारवाईबाबत गंभीर नसल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केले जात असल्याचा आरोप रवीराजा यांनी केला.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, PM2.5 आणि PM10 च्या वाढलेल्या पातळीमुळे दमा, खोकला, श्वास घेण्यातील त्रास अशा आजारांचे प्रमाण शहरात झपाट्याने वाढले आहे. बांधकाम परिसरातील धूळ नियंत्रणाची उपाययोजना योग्य नसेल तर प्रदूषण थेट वाढते, असे तज्ज्ञांचे स्पष्ट मत असल्याचे रवी राजा यांनी सांगितले.

कायद्यानुसार महापालिकेला सेन्सर न बसवणाऱ्या किंवा बंद ठेवणाऱ्या प्रकल्पांवर त्वरित दंड ठोठावणे, नोटीस देऊन काम थांबवणे, धूळ नियंत्रण प्रणाली बंधनकारकपणे सुरू ठेवण्याची सक्ती असे अधिकार आहेत. मात्र प्रत्यक्ष कारवाई न करता केवळ इशारे देण्यात येत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. परिणामी, मुंबईकर आरोग्य धोक्यात आले आहेत, त्यामुळे ज्या बांधकाम व्यावसायिकडून नियमांचे उल्लंघन होत असताना महापालिकेने तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी रवीराजा यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी आयुक्तांनी स्वतः लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत रवीराजा यांनी व्यक्त केले.

आजपासून शाळांची घंटा वाजणार!

ICC Women's T20 World Cup : भारताचे पाकिस्तानवरील वर्चस्व अबाधित

FIFA World Cup 2026 : ब्राझीलचा सलामीलाच संघर्ष; मोरोक्कोविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान; नेयमारची उणीव जाणवली

Father's Day 2026 : यंदाचा 'फादर्स डे' कसा साजरा कराल? बाबांसाठी 'या' गोष्टी ठरतील खास

प्रादेशिक पक्ष अडचणीत